कोलकाता - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुलीला ( Sourav Ganguly) छातीत दुखू लागल्याने शनिवारी तातडीने कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीची प्रकृती आज शनिवारी अचानकपणे खालावली. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुली जीममध्ये वर्कआऊट कर असाताना त्याच्या छातीत दुखू लागले. यानंतर कुटुंबीयांनी त्याला वुडलँड्स रुग्णालयात दाखल केले. गांगुली ज्या जीममध्ये वर्कआऊट करत होता, ते त्याच्या घरातच आहे.
सौरव गांगुली (48) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात वुडलँड्स रुग्णालयाने निवेदन जारी करत सांगितले, की 'सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थीर आहे. गांगुली यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकण्यात आले आहे. सध्या ते पूर्णपणे ठीक आहेत. देवाची कृपा.'
गांगुलीने अद्याप कुठल्याही प्रकारची टेस्टे केलेली नाही : ममता -यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोनासोबत फोनवरून संपर्क साधला आणि गांगुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गांगुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. गांगुलीची भेट घेतल्यानंतर, ममता म्हणाल्या, गांगुली आता ठीक आहे. बेडवर आहे. मला आश्चर्य वाटते, की त्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची टेस्ट केलेली नव्हती. तो एक खेळाडू आहे. त्याला अशी काही समस्या असेल याचा आम्ही विचारही करू शकत नाही. डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली आहे. मी येथे डॉक्टरांचे आभार मानते.
क्रिटिकल हेत ब्लॉकेज -बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. वुडलँड्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आफताब खान यांनी सांगितले, की सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील 24 तास लक्ष ठेवण्यात येईल. तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज होते. वुडलँड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रूपाली बसू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितले, की त्यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेज होते. जे 'क्रिटिकल' होते. त्यांना स्टेंट लावण्यात आले आहे.