मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे टेंशन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण काही गोष्टींबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून आता गांगुलीला जास्त काळ अध्यक्षपदावर राहता येणार की नाही, याबाबत संदिग्घता निर्माण झाली आहे.
गांगुलीला केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ का, असा प्रश्नही अनेकांना पडला. गांगुली आता तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहू शकतो. त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या असून बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला होणार आहे आणि त्यात 12 मुद्यांसाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. पण आता ही गोष्ट पुढे होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोढा समितीद्वारा बनवलेल्या घटनेची दुरुस्ती करण्याचा विचार सध्या बीसीसीयमध्ये करत आहे. ही घटना गोपाल शंकरानारायनण यांनी लिहीली होती. आता या घटनेच्या दुरुस्तीला शंकरनारायण यांनी विरोध दर्शवला आहे. जर या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली किंवा काही बदल करण्यात आला तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला यापुढे कुणीही गंभीरपणे घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. जर शंकरनारायण यांच्या वक्तव्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली तर गांगुलीचा कार्यकाळ वाढणार नाही, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता गांगुलीच्या टेंशनमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्ष कायम राहणार? लवकरच होणार मोठा निर्णयभारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. गांगुलीला केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ का, असा प्रश्नही अनेकांना पडला. पण, आता गांगुलीच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची वार्ता येणार आहे. गांगुली आता तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहू शकतो. त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या असून बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला होणार आहे आणि त्यात 12 मुद्यांसाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बरेच मुद्दे चर्चिले जाणार आहेत. त्यासाठी आज मुंबईत एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकपाल, नवीन क्रिकेट सल्लागार समिती आदी काही मुद्दे आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन टर्म काम पाहिल्यानंतर कुलींग ऑफ वेळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा नियम आहे. पण, आता नव्या प्रस्तावानुसार अध्यक्ष आणि सचिव यांना हा नियम लागू राहू नये, अशी सुचना करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी राहिल.