मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. पण गांगुलीच्या टीममध्ये नेमक्या कोण व्यक्ती असतील, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. त्यामुळे दस्तुरखुद्ध गांगुलीनेच आपल्या या टीमचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.
बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ब्रिजेश पटेल यांना अध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. त्यांच्यासमोर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांचे कडवे आव्हान होते. पण यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपले वजन वापरल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या म्हणण्यानंतर गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हटले जात आहे. नॅशनल हेराल्ड या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.
Web Title: BCCI president Sourav Ganguly's team announced, know who got the chance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.