Join us  

'महागुरू' द्रविडच्या 'द्रोणाचार्य' पुरस्कारासाठी BCCIनं बाजूला ठेवला नियम

भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा कोच राहुल द्रविडच्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 5:03 PM

Open in App

नवी दिल्ली - भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा कोच राहुल द्रविडच्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी विराट कोहली, अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन आणि स्मृती मानधाना आणि सुनील गावसकर यांची ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. विनोद राय म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारामध्ये आम्ही सरकारकडे नामांकने पाठवली आहेत.  द्रोणाचार्य पुरस्कारासाठी आम्ही द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे.  यावर्षी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षाखालील संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. 2016 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. संघाच्या योगदान द्रविडचा वाचा मोलाचा आहे. त्यामुळं द्रविडच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. 

राहुल द्रविड 19 वर्षाखालील आणि भारतीय अ संघामध्ये ताळमेळ साधण्याचे उत्तम काम करत आहे. बीसीसीआयने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन पाठवणे बंद केले होते. कधीकधी कोच खेळाडूंचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. बीसीसीआयच्या एका वरिष्ट आधिकारी म्हणाला की, भारताच्या एका माजी खेळाडूने दोन नामंकनांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या त्यावेळी कोचनेही आपल्या मार्गदर्शनाखाली त्याने ही कामगिरी केली आहे. त्यानंतर बीसीसीआयने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकने पाठवणे बंद केले होते. पण राहुल द्रविडची कामगिरी पाहून बीसीसीआयने आपला नियम बाजूला ठेवून द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकण पाठवले आहे.  

खेल रत्न पुरस्कारसाठी विराट कोहलीची शिफारस

भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे स्पोर्टस् अॅवार्ड कमिटीच्या बैठकीत विराटच्या नावावर मोहोर उमटल्यास त्याला हा सर्वोच्च सन्मान मिळू शकतो. बीसीसीआयने दुसऱ्यांदा खेल रत्न पुरस्कारासाठी कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. याआधी 2016 मध्ये बीसीसीआयने कोहलीची शिफारस केली होती.  

ध्यानचंद पुरस्कारासाठी सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारसमेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी भारताचे महान सलामीवीर सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. हा पुरस्कार आतापर्यंत 51 खेळाडूंना मिळालेला आहे. मात्र आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. गावसकर यांना याआधी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   

शिखर धवन - स्मृतीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

 पुरुष भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मनधनाच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली  आहे.  गेल्या वर्षभरात या दोन्ही खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.  शिखर धवनने गेल्या काही वर्षात आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. तर दुसरीकडे, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये महिला क्रिकेटर स्मृती मनधनाने दमदार कामगिरी केली होती. तसेच यावेळी तिने आयसीसी रँकींगमध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली होती. 

 

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआय