भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCIच्या या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यात २०२३मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेबाबतही विचारमंथन झालं. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. यानंतर पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू, पत्रकार सारेच खवळले आणि BCCIला धमकी देऊ लागलेत.
सौरव गांगुलीचा 'डबल' गेम झाला! BCCI चं अध्यक्षपद गेलं अन् जय शाह अँड टीमने आणखी एक धक्का दिला
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेला सदस्यत्व सोडण्याची धमकी देऊन BCCIवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. PCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट भारतात २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीच दिली. Geo Newsने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांच्या घोषणेनंतर PCBच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यात BCCIच्या निर्णयावर टीका केली गेली. २०१२ पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. २००८मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. ''PCB आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ICC आणि ACC यांनाही हे माहित्येय की पाकिस्तानने भारताता होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेच नुकसान आहे,''असे PCBच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
''यापलिकडे मी जास्त काही बोलू इच्छित नाही, परंतु आम्ही हा मुद्दा पुढील महिन्यात मेलबर्न येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत उपस्थित करणार आहोत,''असेही तो म्हणाला. PCB चेअरमन रमीझ राजा आणि अन्य अधिकारीही प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. “पीसीबीचे अधिकारी जय शाहच्या विधानाच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाले आहेत, कारण सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया चषक होणार आहे आणि जवळपास एक वर्ष बाकी आहे. जय शाह यांनी आशियाच क्रिकेट परिषद आशिया चषक पाकिस्तानातून यूएई येथे खेळवण्याचे विधान केले असेल, तर त्यांना सांगू इच्छितो की ही स्पर्धा पाकिस्तानात व्हावी हा ACC कार्यकारिणी सदस्यांचा निर्णय आहे, अध्यक्षांचा नव्हे.''असेही सूत्रांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"