नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंची डोप चाचणी करण्याची राष्ट्रीय डोपिंग विरोधी (नाडा) संस्थेची मागणी शुक्रवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) फेटाळून लावली. क्रिकेटपटूंचे डोप परीक्षण सरकारी संस्था असलेल्या ‘नाडा’च्या अधिकारकक्षेत येत नसल्याचे बोर्डाचे मत आहे.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी ‘नाडा’ प्रमुख नवीन अग्रवाल यांना पत्र लिहून बीसीसीआय राष्टÑीय क्रीडा महासंघांचा (एनएसएफ) भाग नाही. बीसीसीआयची स्वत:ची डोपिंग विरोधी यंत्रणा भक्कम असल्यामुळे ‘नाडा’द्वारे खेळाडूंची डोप चाचणी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. बीसीसीआय राष्टÑीय क्रीडा महासंघांमध्ये मोडत नसल्याने ‘नाडा’ला आमच्या खेळाडूंची डोप चाचणी करण्याचे अधिकार नाहीत, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. सामन्याआधी किंवा सामन्यानंतर डोप चाचणीस ‘नाडा’ला सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बीसीसीआयने प्रशासकांच्या समितीचा (सीओए) सल्ला घेतल्यानंतर कळविले आहे. जोहरी यांनी ‘नाडा’ प्रमुखांशिवाय क्रीडा सचिवांनाही बीसीसीआयची भूमिका कळविली आहे.
क्रीडा मंत्रालयाने मागच्या महिन्यात बीसीसीआयला पत्र लिहून डोपिंगबाबत ‘नाडा’ला सहकार्य करण्यास सांगितले होते. ‘नाडा’ला बीसीसीआयचे सहकार्य मिळत नसल्याने विश्व डोपिंगविरोधी संस्थेद्वारा नियमांचे पालन होत नसल्याचा वारंवार आरोप केला जातो, असे मंत्रालयाने म्हटले. बीसीसीआयची डोपिंग यंत्रणा भक्कम आहे. याअंतर्गत स्पर्धेआधी व नंतर घेतलेल्या नमुन्यांचा तपास ‘वाडा’द्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत केला जातो, असा दावा जोहरी यांनी केला.
बीसीसीआयची स्वतंत्र डोपिंग यंत्रणा असून ती भक्कम आहे. याअंतर्गत घेतलेल्या नमुन्यांची चाचणी ‘वाडा’द्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत होते. त्यामुळे बीसीसीआय ‘वाडा’ नियमांचे पालन करीत असल्याचा दावा सीईओ राहुल जोहरी यांनी केला.
Web Title: BCCI rejects Dope test of cricketer; The demand for 'nada' has been rejected
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.