ठळक मुद्देपाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी भारतात सुखरुप परतले. बीसीसीआयने या वीरपुत्रला अनोखी सलामी दिली आहे. बीसीसीआयकडून नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात सुखरुप परतले. अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.
बीसीसीआयने या वीरपुत्रला अनोखी सलामी दिली आहे. बीसीसीआयकडून शुक्रवारी भारतीय संघासाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव लिहिले आहे आणि जर्सीचा नंबर एक आहे. दरम्यान, ही जर्सी परिधान करुन भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. सध्या ही जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझे धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.'
दरम्यान, 14 फेब्रुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली. यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र,अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले.
Web Title: BCCI releases special India jersey to welcome IAF pilot Abhinandan Varthaman's return to India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.