IND vs AFG | नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलच्या आजारामुळे संघाची डोकेदुखी वाढल्याचे दिसते. कारण आपल्या सलामीच्या सामन्याला मुकलेला शुबमन गिल अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात देखील खेळणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. गिल ९ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय संघासोबत दिल्लीला जाणार नाही.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुबमन गिल ९ तारखेला टीम इंडियासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळू न शकलेला सलामीवीर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याला देखील मुकणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ तारखेला दिल्लीत सामना होणार आहे. गिल चेन्नईतच राहणार असून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील. खरं तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात गिलच्या अनुपस्थितीत इशान किशनला संधी मिळाली होती आणि तो कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला होता.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू