आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर BCCI ला मोठी लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सरसाठी जाहीरात दिली होती. त्यानुसार आता मास्टरकार्डच्या जागी बीसीसीआयला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. Infrastructure Development Finance Company अर्थात IDFC ही पुढील तीन वर्षांसाठी भारतीय संघाची टायटल स्पॉन्सर असणार आहे. PayTMचा करार संपुष्टात आल्यानंतर मास्टरकार्डने बाजी मारली होती.
BCCI ला नवा टायटल स्पॉन्सर IDFC ने Sony Sports ला मागे टाकले अन् ते आता बीसीसीआयला प्रती सामना ४.२ कोटी देणार आहेत. दोनच कंपन्यांनी बोली लावल्याने बीसीसीआयने बेस प्राईज २.४ कोटी केली होती. यापूर्वी मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रती सामना ३.८ कोटी देत होते आणि आता बीसीसीआयला ६० लाखांचा फायदा झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी IDFC हे टायटल स्पॉन्सर असतील.
१ सप्टेंबरपासून बीसीसीआय आणि IDFC यांच्यातला तीन वर्षांचा करार सुरू होईल. या कालावधीत भारतात होणाऱ्या ५६ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय या करारातून पुढील तीन वर्षांत ९८७.८४ कोटी महसुल कमावतील.