नवी दिल्ली : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये ३० ऑगस्टपासून आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जाणार आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे, तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असतील. सलामीचा सामना पाकिस्तानातील मुल्तान येथे होणार असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा सामना पाहण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांचा देखील समावेश आहे. पण, शाह हे आमंत्रण स्वीकारून शेजारील देशात जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशिवाय अन्य क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनाही आमंत्रण देण्यात आले आहे, जे आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य आहेत. पाकिस्तानने आगामी स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पाकिस्तानी संघ मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. तर, बीसीसीआय २१ ऑगस्ट रोजी भारतीय संघ जाहीर करेल असे समजते. अद्याप पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे.
२०२३ च्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. यावेळी देखील भारत आणि पाकिस्तानचे सामने दोनदा पाहायला मिळतील. लक्षणीय बाब म्हणजे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर भारत-पाकिस्तान थरार तीनदा पाहायला मिळणार आहे.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: BCCI Secretary Jai Shah has been invited by Pakistan Cricket Board to watch the first match of Asia Cup 2023 in Multan, Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.