नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतात तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी वन डे विश्वचषकाचे आयोजन होत आहे. आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे. वन डे विश्वचषकासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयच्या वतीने बोर्डाचे सचिव जय शाह यांनी दिग्गज अभिनेता रजनीकांत यांना स्पर्धेसाठी गोल्डन तिकीटाच्या रूपात एक खास भेट दिली.
बीसीसीआयतर्फे अभिनेते रजनीकांत यांना विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी आमंत्रण देण्यात आले असून गोल्डन तिकिट देण्यात आले आहे. बीसीसीआयने रजनीकांत आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांचा फोटो शेअर केला असून 'या दिग्गज अभिनेत्याने भाषा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन लाखो लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू