वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', BCCI सचिव जय शाह यांनी दिली खास 'भेट'

what is Golden Ticket : वन डे विश्वचषकासाठी बरोबर एक महिन्याचा कालावधी उरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 01:30 PM2023-09-08T13:30:03+5:302023-09-08T13:30:24+5:30

whatsapp join usJoin us
 BCCI Secretary Jai Shah has given golden ticket to legend and god of cricket Sachin Tendulkar for odi world cup 2023  | वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', BCCI सचिव जय शाह यांनी दिली खास 'भेट'

वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', BCCI सचिव जय शाह यांनी दिली खास 'भेट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

odi world cup 2023 india team | नवी दिल्ली : वन डे विश्वचषकासाठी आता फक्त काही दिवसांचा कालावधी उरला आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतात या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगला आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतात तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी वन डे विश्वचषकाचे आयोजन होत आहे. आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. 

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिग्गज, क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरला गोल्डन तिकिट दिले आहे, ज्याद्वारे सचिन भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये विश्वचषकातील सामना पाहू शकेल आणि त्याला प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान मिळेल. बीसीसीआयनेजय शाह आणि सचिन तेंडुलकर यांचा फोटो शेअर केला आहे.

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. "आमच्या 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' कार्यक्रमाचा भाग म्हणून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतरत्न श्री सचिन तेंडुलकरला गोल्डन तिकिट प्रदान केले. क्रिकेट आणि देशासाठी हा एक प्रतिष्ठित क्षण आहे. क्रिकेटमधील उत्कृष्टतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या प्रवासाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आता तो आयसीसी वन डे विश्वचषकाचा साक्षीदार असणार आहे", अशा आशयाचे कॅप्शन बीसीसीआयने दिले. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

विश्वचषकातील भारताचे सामने - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू
 

Web Title:  BCCI Secretary Jai Shah has given golden ticket to legend and god of cricket Sachin Tendulkar for odi world cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.