T20 World Cup team - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचे संघ जाहीर झाले आहेत. भारतीय संघाची सर्वांना उत्सुकता लागली आहे आणि त्यादृष्टीने हालचालींनी वेग पकडला आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात रविवारी २८ एप्रिलला दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर आज आगरकर अहमदाबाद येथे बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेण्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचले. या दोघांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली आणि या बैठकीत रोहित शर्मा व्हिडीओ कॉन्फरन्सने उपस्थित होता.
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
सलामी, मधली फळी, यष्टीरक्षक-फलंदाज, ऑलराऊंडर, स्पिनर अन् जलदगती गोलंदाज या सर्व बाजूंवर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली. सलामीसाठी रोहित शर्मा फिक्स आहे, त्याच्यासोबत विराट कोहलीला खेळवायचं की यशस्वी जैस्वालला? यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू, रिषभ, लोकेश अशी तिरंगी लढत आहे. ऑलराऊंडरसाठी हार्दिक, शिवम तर फिरकीसाठी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र, रवी बिश्नोई हे चर्चेत आहेत. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज पक्का आहे. त्यांना सोबतीला अर्शदीप, आवेश, मयांक यादव यापैकी कोण हा प्रश्न आहे.
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा