Jay Shah On T20 World Cup Victory : भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून जग जिंकले. या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला. मुंबईत वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्ह परिसरात व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने विजयासह ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. अशातच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर त्यांनी विश्वचषक चार शिलेदारांना समर्पित केला. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
तसेच अंतिम सामन्यातील अखेरची पाच षटके खूप महत्त्वाचे होती. यामुळे भारताला विजय मिळवता आला. म्हणूनच सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांचे आभार मानतो. आता पुढील अध्याय म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) आहे. मला खात्री आहे की, भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात या दोन्हीही स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स होईल, असेही बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले.
दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.
Web Title: BCCI Secretary Jay Shah congratulates the Indian cricket team on winning the ICC T20 World Cup, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.