Join us  

BREAKING : जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; १ तारखेपासून कारभार सांभाळणार

बीसीसीआय सचिव जय शाह हे आयसीसीचे नवे अध्यक्ष झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 8:07 PM

Open in App

jay shah icc chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांची या पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. आज नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्याने जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. विशेष बाब म्हणजे १६ पैकी १५ सदस्यांचा शाह यांना पाठिंबा होता. पण, शाह यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला आहे. खरे तर जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. (jay shah bcci secretary) भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले होते की, जय शाह यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यास जगभरातील क्रिकेटसाठी फायद्याचे ठरेल.

जय शाह हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

दरम्यान, आयसीसीचे मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी २० ऑगस्ट रोजी पुन्हा आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार कळवला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. शाह हे एकमेव उमेदवार असल्याने आणि त्यांची जागतिक क्रिकेटवर असलेली पकड पाहता त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला. त्यांनी २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ठोस पावले टाकली, असे आयसीसीने एका निवेदनात सांगितले. 

टॅग्स :जय शाहआयसीसीबीसीसीआय