Join us  

अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी BCCI १ कोटी रूपये देणार; Jay Shah यांचा मोठा निर्णय

अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढे आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 1:50 PM

Open in App

ब्लड कॅन्सरशी झुंज देत असलेले माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढे आले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रूपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जय शाह यांनी कॅन्सरशी झुंज देत असलेले भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीने १ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. खरे तर माजी खेळाडू कपिल देव यांनी गायकवाड यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. 

दरम्यान, ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या गायकवाड यांना बीसीसीआयने आर्थिक मदत करावी अशी मागणी कपिल देव यांनी केली. ७१ वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर मागील एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयला मदतीची विनंती करण्यासोबतच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले. गायकवाड यांच्या उपचारासाठी मी माझी पेन्शन देण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कपिल देव काय म्हणाले?

हे अतिशय दुःखद आणि निराशाजनक आहे. मला वेदना होत आहेत कारण मी अंशुसोबत खेळलो आहे आणि मी त्याला या अवस्थेत पाहू शकत नाही. कोणालाही त्रास होऊ नये असे मला वाटते. मला माहित आहे की बोर्ड (BCCI) त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. अंशुसाठी कोणतीही मदत करायची असेल तर हा त्यांचा निर्णय आहे. काही धोकादायक गोलंदाजांसमोर उभे असताना, त्यांचा सामना करताना अंशुमानच्या चेहऱ्यावर आणि छातीवर जखमा झाल्या. आता त्याच्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की क्रिकेट चाहते त्याला निराश करणार नाहीत. चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, अशा शब्दांत कपिल देव यांनी आपल्या सहकारी खेळाडूसाठी आवाज उठवला.

टॅग्स :जय शाहबीसीसीआयकपिल देवभारतीय क्रिकेट संघ