Join us  

Indian Player Tested Covid-19 Positive : टीम इंडियाच्या खेळाडूंनी जय शाह यांच्या सूचनेकडे केलं दुर्लक्ष; खेळाडू Delta variantनं संक्रमित?

Indian Player Tested Covid-19 Positive : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २३ सदस्यीय टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी येऊन धडकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:30 AM

Open in App

Indian Player Tested Covid-19 Positive : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २३ सदस्यीय टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी येऊन धडकले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर होते. या सुट्टीत खेळाडूंनी कुटुंबीयांसोबत भटकंती केली, काहींनी यूरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या, तर काहींनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सामन्यांना हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा बायो बबलमध्ये परतल्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली गेली अन् त्यात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापैकी एकाचा रिपोर्ट दुसऱ्या टेस्टमध्ये निगेटिव्ह आला असून पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला विलगिकरणात ठेवले गेले आहे. हा खेळाडू इतर खेळाडूंसह डरहॅम येथे प्रवास करणार नाही. ( One of the 23 India cricketers on the ongoing tour of England has tested positive for COVID-19 during the team's 20-day break) 

रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेसह भारतीय क्रिकेटपटू करतायेत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक मेल पाठवला होता आणि त्यात त्यांनी लंडनमधील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत कल्पना दिली होती. २० दिवसांच्या सुट्टीनंतर खेळाडू डरहॅम येथील बायो बबलमध्ये दाखल झाले आणि त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ''होय एका खेळाडूला कोरोना झाला आहे. त्याला सध्या विलगिकरणात ठेवले गेले आहे आणि तो इतर सदस्यांसोबत प्रवास करणार नाही,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले. हा खेळाडू कोण आहे, याबाबत गुप्तता पाळली गेली आहे. ESPN Cricinfo नं दिलेल्या वृत्तानुसार हा खेळाडू Delta variant संक्रमित झाला आहे. लंडनमध्ये या Delta variantचे रुग्ण वाढत आहेत. 

Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत!

जय शाह यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष!जय शाह यांनी त्यांच्या ई मेलमध्ये खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यास सांगितले होते. त्यांनी हेही म्हटले होते की, ''Covishield लस तुम्हाला फक्त सुरक्षा पुरवेल, व्हायरसपासून पूर्णपणे वाचवणार नाही.'' शाह यांनी खेळाडूंना विम्बल्डन आणि यूरो स्पर्धेत जाण्याचे टाळण्यास सांगितले होते.  

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

  1. ४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज
  2. १२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स
  3. २५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले
  4. २ ते ६ सप्टेंबर - ओव्हल
  5. १० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड

 

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयजय शाह