वेस्ट इंडिजकडून ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने हार पत्करल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह तातडीने मियामी येथे पोहोचले अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत दोन तास चर्चा केली. जय शाह यांनी आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची आठवण करून देताना द्रविडसोबत अनेक विषयांवर चर्चा केल्याचे वृत्त समोर येत आहे. आशिया चषक आणि वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जय शाह यांनी मुख्य प्रशिक्षकांना त्यांच्या जबाबदारीची आणि BCCI ला काय अपेक्षित आहे याची जाणीव करून दिली.
संजू सॅमसनला डच्चू, लोकेश राहुलची एन्ट्री! Asia Cup साठीच्या भारतीय संघाबाबत मोठे अपडेट्स
मियामी येथे ही मीटिंग जवळपास २ तास चालली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा वर्ल्ड कप भारत जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी द्रविडला सांगितले. भारतीय संघाची आयसीसी स्पर्धांमधील मागील काही वर्षांतील कामगिरी असमाधानकारक झालेली आहे. त्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका गमावल्याने संघावर व संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. आता राहुल द्रविडला आशिया चषक व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याचे दडपण असेल. आशिया चषक गमावला तरी द्रविडची नोकरी काही जाणार नाही, परंतु वर्ल्ड कप मध्ये अपयश आल्यास त्याची गच्छंती पक्की आहे.
जय शाह यांच्यासोबत झालेली बैठक राहुल द्रविडसाठी धोक्याची घंटा? - राहुल द्रविड हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रशिक्षक आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविडने ही जबाबदारी स्वीकारली- द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने द्विदेशीय मालिका जिंकल्या, परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन फायनलमध्ये भारताला ( न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) हार पत्करावी लागली.- इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटीही गमावल्यानं मालिका बरोबरीत सुटली.- मागच्या वर्षी आशिया चषक ( ट्वेंटी-२०) स्पर्धेत अंतिम फेरीतही पोहोचता आले नाही - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून १० विकेट्सने दारूण पराभव. त्याशिवाय वेस्ट इंडिज ( ट्वेंटी-२०), बांगलादेश ( वन डे) आणि दक्षिण आफ्रिका ( कसोटी व वन डे) दौऱ्यावर पराभव