T20 World Cup 2022 मध्ये टीम इंडियाचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. भारताला इंग्लंडच्या संघाकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासाठी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी रोहित शर्माने कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयावर काही लोकांनी टीका केली. आता रोहितला टी२० संघाच्या कर्णधारपदावरून दूर करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. तशातच वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCIने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली. शुक्रवारी रात्री उशिरा या संदर्भातील घोषणा करण्यात आली. त्यानंतर, सोशल मीडियावरविराट कोहलीच्या फॅन्स मंडळींनी चांगलीच मजा घेतली.
निवड समितीची हकालपट्टी आणि विराट कोहलीचा संबंध काय?
टी२० विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचे खापर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवर फुटले. शुक्रवारी रात्री उशिरा ही घोषणा झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले, कारण गेल्या वर्षभरात घडलेल्या प्रकारामुळे प्रत्येकजण नक्कीच निराश झाला होता. तसेच, सोशल मीडियावर चाहत्यांनी याला 'कर्माचे फळ' म्हटले. कारण निवडकर्त्यांनी विराट कोहलीला ज्या प्रकारे कर्णधारपदावरून हटवले होते, त्यामुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले. त्यांनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर करत ट्रोलिंग केले.
--
--
T20 विश्वचषक 2022 नंतर, चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली आणि विराट कोहलीचे कर्णधारपद एक वर्षापूर्वी म्हणजे 2021 च्या T20 विश्वचषकानंतर काढून घेण्यात आले. त्यानंतर विराट कोहली आणि निवड समितीमध्ये बराच वाद झाला, याशिवाय कोहलीचे सौरव गांगुलीसोबतही मतभेद झाले.
--
चाहत्यांनी मीम्सद्वारे आठवण करून दिली की सौरव गांगुली आता बीसीसीआय अध्यक्ष नाही, चेतन शर्मा आता निवड समितीचे अध्यक्ष नाहीत. पण किंग कोहली अजूनही किंग आहे.
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती, पण इंग्लंडने त्यांचा १० विकेट्सने पराभव केला होता. आयसीसी स्पर्धांतील सततच्या पराभवामुळे चाहते संतापले होते आणि हा राग यावेळी उफाळून आला. त्यामुळे विश्वचषकापासून संघातील वरिष्ठ खेळाडू निशाण्यावर होते आणि त्याचवेळी बीसीसीआयला लक्ष्य करण्यात आले.