IND vs SA ODI Series : शिखर धवनकडे नेतृत्व, Sanju Samson भारतीय संघाचा उप कर्णधार! लवकरच संघ जाहीर होणार

IND vs SA ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:32 AM2022-09-27T11:32:23+5:302022-09-27T11:32:52+5:30

whatsapp join usJoin us
BCCI Selectors to announce India Squad for ODI series against south Africa tomorrow, Shikhar Dhawan to lead, Sanju Samson deputy | IND vs SA ODI Series : शिखर धवनकडे नेतृत्व, Sanju Samson भारतीय संघाचा उप कर्णधार! लवकरच संघ जाहीर होणार

IND vs SA ODI Series : शिखर धवनकडे नेतृत्व, Sanju Samson भारतीय संघाचा उप कर्णधार! लवकरच संघ जाहीर होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना उद्या तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. पण, या मालिकेत हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार खेळणार नाही, दीपक हुडानेही पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. मोहम्मद शमी अद्याप कोरोनातून बरा झालेला नाही आणि त्यामुळे उमेश यादव संघासोबत कायम आहे. शाहबाज अहमद व श्रेयस अय्यर यांची निवड केली गेली आहे. ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारतीय संघ तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे आणि त्याचे नेतृत्व शिखर धवन ( Shikhar Dhawan) कडे सोपवले जाऊ शकते. 

हार्दिक, भुवनेश्वरला विश्रांती; मोहम्मद शमी अजूनही अनफिट! भारत-द. आफ्रिका मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

BCCI ची निवड समिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे संघाची बुधवारी घोषणा करणे अपेक्षित आहे. ट्वेंटी-२० संघातील सदस्य पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील आणि त्यामुळे त्यांचा वन डे मालिकेत समावेश नसणार आहे. अशात गब्बर भारताच्या वन डे संघाचे नेतृत्व सांभाळेल आणि संजू सॅमसनला ( Sanju Samson) उप कर्णधारपद दिले जाण्याचा अंदाज आहे. संजू सध्या भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळतोय आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ''रोहित शर्मा, विराट कोहली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघासाठी निवडलेले खेळाडू आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार नाहीत. शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व असेल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.    

अरेरे किती वाईट! Rishabh Pant सर्वांकडे अपेक्षेने पाहत होता, पण कुणी लक्षच दिले नाही, Video

भारताचा संभाव्य संघ - शिखर धवन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन ( उप कर्णधार), राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उम्रान मलिक, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन    

दक्षिण आफ्रिकेचा वन डे  संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स,  हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.  

IND vs SA ODI Schedule:
पहिली वन डे - ६ ऑक्टोबर, रांची
दुसरी वन डे - ९ ऑक्टोबर, लखनौ
तिसरी वन डे - ११ ऑक्टोबर, दिल्ली

Web Title: BCCI Selectors to announce India Squad for ODI series against south Africa tomorrow, Shikhar Dhawan to lead, Sanju Samson deputy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.