भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस?

BCCI : कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान 50 टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:01 PM2021-09-15T15:01:36+5:302021-09-15T15:05:34+5:30

whatsapp join usJoin us
bcci set to hike domestic players match fees board apex council is finalise pay hike on september 20 | भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस?

भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI)भारतीय क्रिकेटपटूंवर पैशाचा वर्षाव करणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंचे वेतन दिवाळीपूर्वी वाढवले जाण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबरला बीसीसीआय सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत भारतीय क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात सुमारे 40 टक्के वाढ होऊ शकते. बीसीसीआय राज्य संस्थांच्या सहकार्याने भारतीय क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देखील देऊ शकतो. (bcci set to hike domestic players match fees board apex council is finalise pay hike on september 20)

स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे वेतन 50000 रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. टी-20 मॅचसाठी खेळाडूंना 25000 रुपये मिळू शकतात. आतापर्यंत खेळाडूंना रणजी ट्रॉफीसाठी प्रतिदिन 35000 रुपये आणि विजय हजारेमध्ये 35,000 रुपये मॅच फी म्हणून मिळतात. सय्यद मुश्ताक अली टी -20 स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रत्येक मॅचसाठी 17,500 रुपये मिळतात. राखीव खेळाडूंना मॅच फीचे 50 टक्के वेतन मिळते.

बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने 2019 मध्ये एका केंद्रीय कराराची घोषणा केली. आता ही घोषणा लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला क्रिकेटपटूही मॅच फी वाढीची आशा आहे. सध्या महिला क्रिकेटपटूंना प्रति वनडे 12,500 रुपये आणि टी- 20 साठी 6250 रुपये दिले जातात. महिला खेळाडूंच्या मॅच फीमध्ये 25 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान 50 टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते.


बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "2019-20 हंगामात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचाच विचार केला जाईल किंवा कमीतकमी गेल्या दोन हंगामातील खेळाडू असतील, या मुद्दावर चर्चा झाली होती." अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह घेतील. बहुतेक बीसीसीआयच्या सदस्यांचे असे मत आहे की, खेळाडूंना 50 टक्के भरपाई दिली पाहिजे. दरम्यान,  सध्या रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना ज्यांना प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले आहे, त्यांना मॅच दरम्यान दररोज 35,000 रुपये मिळतात. जर सामना चार दिवस चालला तर खेळाडू 1.4 लाख रुपये कमवतात. याचा अर्थ खेळाडूंना एका सामन्यासाठी 70,000 रुपयांची भरपाई मिळू शकते.

Web Title: bcci set to hike domestic players match fees board apex council is finalise pay hike on september 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.