Women's Indian Premier League २०२३ : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये महिला आयपीएलची सुरुवात होणार आहे. मागील अनेक वर्ष महिला आयपीएलचा प्रस्ताव चर्चेत होता अन् यंदा तो प्रत्यक्षात उतरणार आहे. महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्कासाठीच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी झेप मानली जात आहे. त्यात बीसीसीआयनेही आता महिला आयपीएल यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे.
मोठी बातमी : दुसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाला ICC ने दिला दणका; रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार
बीसीसीआयने महिला खेळाडूंसाठी १२ कोटी ही सॅलरी कॅप ठरवली आहे. म्हणजे एका महिला खेळाडूला किमान १२ कोटी मिळू शकतात. ही कॅप दरवर्षी १.५ कोटींनी वाढवण्यात येईल आणि पाच वर्षांनंतर ती १८ कोटींपर्यंत जाईल. पुरुषांच्या आयपीएल प्रमाणे येथे मात्र आदर्श खेळाडू ही संकल्पना नाही. महिला आयपीएलमध्ये पाच संघांचा समावेश असणार आहे आणि तन वर्षांनंतर ही संख्या सहा करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
याशिवाय महिला आयपीएलमध्ये एका संघा पाच परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली गेली आहे आणि या पाच खेळाडूंमध्ये एक खेळाडू हा संलग्न देशाच्या संघातील असायला हवा. पुरुष आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडूंनाच संधी दिली जाते. पहिल्या महिला आयपीएल स्पर्धांच्या तारखा अद्याप फायनल झाल्या नसल्या तरी Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार ४ ते २६ मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असल्याचे समजतेय. मुंबईच्या ब्रेबॉर्न व नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर महिला आयपीएलचे २२ सामने खेळवण्यात येतील.
पुरुषांची आयपीएल स्पर्धा ३१ मार्च किंवा १ एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळेच वानखेडेवर महिला आयपीएलचे सामने खेळवले जाणार नाहीत. महिला आयपीएल स्पर्धेतील विजेत्या संघाला ६ कोटी, तर उप विजेत्याला ३ कोटी दिले जाणार आहेत. खेळाडूंसाठी एकूण १० कोटींची बक्षीसं ठेवली गेली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"