ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकीटांवरून मोठा गोंधळ उडताना दिसतोय... ज्या वेबसाईटवर तिकिटांची विक्री होतेय, तेथे काही मिनिटांतच साईट क्रॅश झाल्याच्या तक्रारी येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यानेही ट्विट करून बीसीसीआयला या मुद्यावर लक्ष देण्याची विनंती केली होती. चाहत्यांचा रोषाचा बीसीसीआयला सामना करावा लागतोय. अशात बुधवारी BCCI ला शहाणपण सुचल्याचे दिसले. त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेची ४ लाख तिकीटं लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.
यजमान राज्य संघटनांशी चर्चा केल्यानंतर, BCCI ने अत्यंत अपेक्षित असलेल्या स्पर्धेसाठी अंदाजे ४ लाख तिकीटं विक्रिसाठी उपलब्ध केली आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांचा सहभाग सुनिश्चित करून, शक्य तितक्या उत्कट क्रिकेट चाहत्यांना सामावून घेण्याचा हा उपाय आहे. जगभरातील क्रिकेट रसिक आता वर्षातील क्रिकेटच्या अनोख्या खेळाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांची जागा सुरक्षित करू शकतात. चाहत्यांना त्यांची तिकीटं सुरक्षित करण्यासाठी तत्परतेने कार्य करण्यास प्रोत्साहित केले जाते, कारण इव्हेंटमध्ये प्रचंड जागतिक स्वारस्य लक्षात घेता तिकिटांना जास्त मागणी असणे अपेक्षित आहे, असे BCCI ने म्हटले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामन्यांच्या तिकिटांची सामान्य विक्री ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून सुरू होईल. चाहते https://tickets.cricketworldcup.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन खरेदी करू शकतात.