Join us

आयपीएलसाठी बीसीसीआयची विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू

बीसीसीआयचे काही अधिकारी ‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:37 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाचे आयोजन आयसीसीने पुढे ढकलले आणि बीसीसीआयला दिलासा मिळाला. आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

यंदा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये आयपीएल खेळवली जाणार असल्याची माहिती, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली होती. यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने यंदाच्या परदेशवारीसाठी विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू केलेली असल्याची माहिती पुढे आली आहे.

बीसीसीआयचे काही अधिकारी ‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत. ऑगस्ट महिन्यात खेळाडूंना भारत ते युएई प्रवास करायचा असेल तर विमानांचे बुकिंग व इतर गोष्टींवर काम सुरू झाल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले. दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा विविध आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खेळाडूंना युएईमध्ये न्यावे लागेल. यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे.

खेळाडूंव्यतिरिक्त बीसीसीआयचे काही अधिकारी दुबई, शारजा आणि अबू धाबी येथे तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा घेणार आहेत. ‘आयोजनाच्या बाबतीत आयपीएलची वेगळी ख्याती आहे. त्यामुळे यंदा युएईमध्ये स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल 2020