Join us  

IPL 2021: एक डाव ९० मिनिटांत संपविण्याचं बंधन अन् पंचांची ताकद वाढली; IPL साठी BCCI चे नवे नियम

नव्या नियमानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपला डाव ९० मिनिटांच्या आत संपवावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:29 PM

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यासाठी क्रिकेट चाहते देखील उत्सुक झाले आहेत. पण यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा आयपीएल २०२१ साठी वेळाच्याबाबतीत कठोर निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपला डाव ९० मिनिटांच्या आत संपवावा लागणार आहे. या निर्णयामुळे चौथ्या पंचाची ताकद वाढणार आहे. (BCCI Strict On Time One Inning Should Be Finished In 90 Minutes In IPL 2021) 

काय सांगतो वेळेचा नवा नियम?बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं. 

"आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला एका तासात सरासरी १४.११ षटकं टाकणं बंधनकारक असणार आहे. यात टाइमआऊटच्या वेळेचा समावेश नसेल. कोणत्याही व्यत्ययाशिवाय होणारा सामन्याचा एक डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. म्हणजेच खेळासाठी ८५ मिनिटं आणि ५ मिनिटं टाइमआऊटसाठी असतील. व्यत्यय येणाऱ्या सामन्यासाठी २० षटकांचा खेळ निर्धारित वेळेत न संपल्यास प्रत्येक षटकासाठी ४ मिनिटं १५ सेकंदाचा अतिरिक्त वेळ देण्यात येऊ शकतो", असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. 

चौथ्या पंचाची ताकद वाढलीसामन्यात कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर चौथ्या पंचाची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. वेळ वाया घालविणाऱ्या फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार चौथ्या पंचांना असणार आहे. संघाकडून वेळेच्या बंधनाचा नियम भंग झाल्यास स्लो ओव्हर रेटच्या शिक्षा करण्याचा अधिकार चौथ्या पंचाला असणार आहे.  

टॅग्स :आयपीएलबीसीसीआयआयपीएल २०२१ मिनी ऑक्शन