मुंबई : एक संघटना म्हणून आपण किती कठोर आहोत, हे बीसीसीआयने पुन्हा एकदा बीसीसीआयने दाखवून दिले आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. यावर आता बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे. या पंड्या आणि राहुल यांची आता चौकशी होणार आहे, त्याचबरोबर या दोघांनाही ऑस्ट्रेलियावरून भारतामध्ये माघारी बोलावले आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला होता. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली होती. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिलं आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी (हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल) केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचं वर्तन चुकीचं होतं,' असं चौधरींनी पत्रात नमूद केलं आहे.