25 Nov, 24 11:47 PM
IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय-काय घडलं?
देशातील सर्वात श्रीमंत अशा टी२० लीग स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे दोन दिवसांची लिलाव प्रक्रिया पार पडली. २४ आणि २५ नोव्हेंबर या दोन दिवसात एकूण ५७७ खेळाडूंपैकी १८२ खेळाडूंना आपला संघ मिळाला. या दोन दिवसांत IPL च्या १० संघांनी मोठमोठ्या बोली लावत तब्बल ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. लखनौ सुपरजायंट्स संघाने यंदाच्याच नव्हे तर IPL इतिहासातील सर्वोच्च बोली लावून २७ कोटींना रिषभ पंतला विकत घेतले. श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी) हे TOP 3 महागडे खेळाडू ठरले. महत्त्वाची बाब म्हणजे, भल्या मोठ्या बोली लागूनही एकूण खेळाडूंपैकी ३९५ खेळाडू UNSOLD म्हणजेच खरेदीदार नसलेलेच राहिले.
25 Nov, 24 11:17 PM
या खेळाडूंचंही नशीब खुललं
मोहित राठी – 30 लाख – RCB
विग्नेश पुथुर – 30 लाख – MI
अशोक शर्मा – 30 लाख – RR
अभिनंदन सिंह – 30 लाख – RCB
लुंगी एनगिडी – 1 करोड़ – RCB
कुलवंत खेजरोलिया – 30 लाख – GT
कुणाल राठोड – 30 लाख – RR
25 Nov, 24 11:17 PM
लिज्जाड विलियम्स मुंबई संघात
मुंबईने लिज्जाड विलियम्सला 75 लाख रुपयांच्या बेस प्राइवर खरेदी केले आहे.
25 Nov, 24 11:15 PM
अर्जुनला अखेर मुंबई इंडियन्सने खरेदी केले
अर्जुन तेंदुलकरला अखेर मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. मुंबईने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले.
25 Nov, 24 09:39 PM
मलिंगा सनरायझर्सच्या ताफ्यात
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले.
25 Nov, 24 09:38 PM
देवदत्त पडिक्कलची घरवापसी
डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल आरसीबीमध्ये परतला. बंगळुरूने त्याला 2 कोटींना विकत घेतले.
25 Nov, 24 09:38 PM
डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड
आयपीएलचा सर्वात यशस्वी परदेशी फलंदाज आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा अनसोल्ड राहिला.
25 Nov, 24 09:37 PM
रहाणे आणि फिलिप्सला मिळाले संघ
अजिंक्य रहाणेला कोलकाताने 1.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. तर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला गुजरातने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले.
25 Nov, 24 08:49 PM
या खेळाडूंना मिळाला संघ
जेमी ओव्हरटन – 1.50 कोटी – CSK
झेवियर बार्टलेट – 80 लाख – PBKS
युवराज चौधरी – 30 लाख – LSG
कमलेश नागरकोटी – 30 लाख – CSK
पायला अविनाश – 30 लाख – PBKS
रामकृष्ण घोष – 30 लाख – CSK
25 Nov, 24 08:48 PM
मुशीर खान पंजाबच्या ताफ्यात
यंदाच्या आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाज सरफराज खानला कोणत्याही संघाने घेतले नाही. पण त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान याला पंजाबने 30 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. पंजाबने सूर्यांश शेडगेलाही ३० लाख रुपयांना विकत घेतले.
25 Nov, 24 07:53 PM
जेकब बैथलला आरसीबीने विकत घेतले
आरसीबीने इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू जेकब बैथलला २.६० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएलमधील बैथलचा हा पहिलाच हंगाम असेल.
25 Nov, 24 07:52 PM
चमीराचे आयपीएलमध्ये पुनरागमन
दिल्ली कॅपिटल्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. यासह चमीराने पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.
25 Nov, 24 07:41 PM
पंजाब किंग्सने प्रियांशला विकत घेतले
दिल्लीचा स्फोटक अनकॅप्ड खेळाडू प्रियांश आर्यसाठी जोरदार बोली लागली आहे. केवळ ३० लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या प्रियांशला पंजाब किंग्जने ३.८० कोटी रुपयांना खरेदी केले. प्रियांश आर्यने काही महिन्यांपूर्वीच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने नाव कमावले होते. विशेष म्हणजे एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते.
25 Nov, 24 07:22 PM
स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी होती.
25 Nov, 24 07:21 PM
गुरजपनीत सिंग चेन्नईच्या संघात
डावखुरा वेगवान गोलंदाज गुरपनीत सिंगला चेन्नई सुपर किंग्जने २.२० कोटी रुपयांना विकत घेतले. गुरपनीत सिंग टीम इंडियाच्या सराव सत्रात विराट कोहलीला बाद केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती.
25 Nov, 24 06:57 PM
जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबादकडे
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला सनरायझर्स हैदराबादने पुन्हा विकत घेतले आहे. उनाडकटला १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी करण्यात आले.
25 Nov, 24 06:49 PM
आरसीबीने नुवान तुषाराला विकत घेतले
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला नवा संघ मिळाला आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.६० कोटी रुपयांना विकत घेतले.
25 Nov, 24 06:48 PM
रोमारियो शेफर्ड आरसीबीकडे
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमॅरियो शेफर्डला आरसीबीने १.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या मोसमात तो मुंबईत होता.
25 Nov, 24 06:46 PM
इशांत शर्मा गुजरातच्या संघात
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. त्यांना ७५ लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. यापूर्वी तो दिल्लीत होता.
25 Nov, 24 06:37 PM
विल जॅकची मुंबईत एन्ट्री
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज विल जॅकने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने पंजाबचा पराभव करत जॅकला ५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. आरसीबीने आरटीएमचाही वापर केला नाही.
25 Nov, 24 06:32 PM
केकेआरने मनीष पांडेला विकत घेतले
भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्सने ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. तो जुन्या कोलकाता संघाचा भाग आहे.
25 Nov, 24 06:12 PM
अर्शद खानला नवीन टीम मिळाली
वेगवान गोलंदाज अर्शद खानला नवीन संघ मिळाला आहे. त्याला गुजरात टायटन्सने १.३० कोटी रुपयांना विकत घेतले.
25 Nov, 24 06:11 PM
१० विकेट घेणारा अंशुल कंबोज चेन्नईमध्ये
रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात १० विकेट घेणारा हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजवर मोठी बोली लागली आहे. अखेर चेन्नई सुपर किंग्सने त्याला ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. अंशुल गेल्या मोसमात मुंबईचा भाग होता.
25 Nov, 24 05:04 PM
ग्लेन फिलिप्स अनसोल्ड
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सलाही खरेदीदार मिळालेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी होती.
25 Nov, 24 05:03 PM
हे स्पिनर्स राहिले अनसोल्ड
केशव महाराज – दक्षिण आफ्रिका
मुजीब उर रहमान – अफगाणिस्तान
विजयकांत – भारत
अकेल हुसेन - वेस्ट इंडिज
आदिल रशीद - इंग्लंड
25 Nov, 24 05:02 PM
अफगाणिस्तानचा गझनफर मुंबईच्या संघात
अफगाणिस्तानचा उदयोन्मुख फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफरही प्रथमच आयपीएलमध्ये आला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला ४.८० कोटी रुपयांना खरेदी केले.
25 Nov, 24 04:49 PM
आकाश दीप लखनऊ सुपर जायंट्सकडे
भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपला नवीन संघ मिळाला आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने ८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आरसीबीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही.
25 Nov, 24 04:42 PM
मुंबईने दीपक चहरला घेतले विकत
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी मुंबई आणि पंजाब यांच्यात लढत झाली. त्यानंतर मुंबईने अखेर ९.२५ कोटींची जोरदार बोली लावून चहरला विकत घेतले. यापूर्वी, दीपक मुंबईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.
25 Nov, 24 04:34 PM
भुवनेश्वरसाठी आरबीची मोठी बोली
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला नवा संघ मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याच्यासाठी सर्वाधिक १०.७५ कोटी रुपयांची बोली लावली.
25 Nov, 24 04:32 PM
तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सच्या संघात
मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून स्पर्धेला सामोरे जाणाऱ्या राजस्थानने तुषारला ६.४० कोटी रुपयांना खरेदी केले. यापूर्वी तो सीएसकेमध्ये होता.
25 Nov, 24 04:18 PM
हे विकेट किपर राहिले अनसोल्ड
शे होप - वेस्ट इंडिज
केएस भारत – भारत
ॲलेक्स कॅरी - ऑस्ट्रेलिया
डोनोव्हन फरेरा - दक्षिण आफ्रिका
25 Nov, 24 04:16 PM
रायन रिक्लेटनची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा उगवता यष्टिरक्षक-फलंदाज रायन रिक्लेटनला विकत घेतले आहे. त्यांना केवळ १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
25 Nov, 24 04:14 PM
नितीश राणा राजस्थान रॉयल्सच्या संघात
अनुभवी फलंदाज नितीश राणाला नवा संघ मिळाला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने ४.२० कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या अनेक मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.
25 Nov, 24 04:13 PM
कृणाल पांड्याला आरसीबीने विकत घेतले
भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्यासाठी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात लढत झाली. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५.७५ कोटींना विकत घेतले.
25 Nov, 24 04:12 PM
वॉशिंग्टन सुंदर गुजरात टायटन्सकडे
भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. अपेक्षेच्या विरुद्ध, सुंदरवर फारशा बोली लागल्या नाहीत आणि गुजरातने त्याला केवळ ३.२० कोटी रुपयांना विकत घेतले.
25 Nov, 24 04:08 PM
पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूरही अनसोल्ड
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यालाही कोणी खरेदीदार मिळाला नाही. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती. तर अष्टपैलू शार्दुल ठाकूरवर कोणीही बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी होती.
25 Nov, 24 04:07 PM
अजिक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल अनसोल्ड
अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल या दोन अनुभवी भारतीय फलंदाजांना खरेदीदार मिळाला नाही.
25 Nov, 24 04:07 PM
फाफ डुप्लेसिसला दिल्लीने विकत घेतले
बंगळुरूचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसला नवा संघ मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
25 Nov, 24 04:06 PM
ग्लेन फिलिप्स अनसोल्ड
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सलाही खरेदीदार मिळालेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी होती.
24 Nov, 24 11:24 PM
मेगा ऑक्शनचा पहिला दिवस संपला...
मेगा लिलावात पहिल्या दिवसाची कारवाई संपली आहे. शेवटचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून आलेल्या श्रेयस गोपालला कुणीही खरेदीदार मिळाला नाही. पहिल्या दिवशी एकूण 84 खेळाडूंचा लिलाव झाला, त्यापैकी 72 खेळाडूंना खरेदी करण्यात आले, तर 12 न विकले गेले. दरम्यान 467.95 कोटी रुपयांची बोली लागली.
24 Nov, 24 11:15 PM
सिमरजीत सिंगला SRH ने खरेदी केले
युवा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंगला सनरायझर्स हैदराबादने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.
24 Nov, 24 11:10 PM
मोहित शर्माला दिल्लीने खरेदी केले
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माला नवा संघ मिळाला आहे. गेल्या 2 हंगामात गुजरातसोबत असलेल्या मोहितला दिल्लीने 2.20 कोटी रुपयांना विकत घेतले.
24 Nov, 24 11:02 PM
रसिख डार सलाम RCB च्या ताफ्यात
अनकॅप्ड वेगवान गोलंदाज रसिख डार सलामला रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरने 6 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. यापूर्वी RCB ने 2 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने RTM अॅक्टिवेट केले होते. यानतंर, बेंगलोरने 6 कोटी रुपयांची बोली लावली.
24 Nov, 24 10:57 PM
अनुजला GT नं तर आर्यनला LSG नं केलं खरेदी
आर्यन जुयालला लखनऊ सुपर जायंट्सने, तर अनुज रावतला गुजरात टायटन्सने 30-30 लाख रुपयांच्या बेस प्राइजवर खरेदी केले आहे.
24 Nov, 24 10:53 PM
रॉबिन मिन्जला मुंबईनं केलं खरेदी
मुंबईने रॉबिन मिंजला 65 लाख रुपयांची बोली लावू खरेदी केले. गेल्या वर्षी तो चेन्नईकडून होता. मात्र तो अपघातामुळे सीझनबाहेर गेला होता.
24 Nov, 24 10:50 PM
नमन धीर मुंबईकडून खेळणार
मुंबई इंडियन्सने ऑलराउंडर नमन धीरला 5.25 कोटी रुपयांत खरेदी केले. राजस्थानने नमनसाठी 3.20 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, मुंबईने RTM चा वापर केला. यावर राजस्थानने 5.25 कोटी रुपयांची बोली लावली, जी मुंबईने मॅच केली.
24 Nov, 24 10:45 PM
समीर रिझवी दिल्ली संघात
समीर रिझवीला दिल्ली कॅपिटल्सने 95 लाख रुपयांत खरेदी केले. CSK ने RTM चा वापर केला नाही.
24 Nov, 24 10:44 PM
नेहाल वढेराला पंजाबने केले खरेदी
पंजाबचा युवा फलंदाज नेहाल वढेराला पंजाबने 4.20 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले आहे. नेहाल गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता.
24 Nov, 24 10:40 PM
नूर अहमदला CSK नं केलं खरेदी
अफगाणिस्तानचा स्पिनर नूर अहमदला चेन्नई सुपर किंग्सने 10 कोटी रुपयांत खरेदी केले.
24 Nov, 24 10:38 PM
वानिंदू हसरंगा राजस्थानकडून खेळणार
राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा स्पिन ऑलराउंडर वानिंदू हसरंगासाठी 5.25 कोटी रुपयांची बोली लावली आणि खरेदी केले. यापूर्वी तो सनरायझर्स संघात होता.
24 Nov, 24 10:37 PM
अॅडम जॅम्पा SRH कडून खेळणार
ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर अॅडम जॅम्पाला सनरायझर्स हैदराबादने 2.40 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
24 Nov, 24 10:34 PM
राहुल चहरला SRH नं केलं खरेदी
भारतीय लेग स्पिनर राहुल चहरला सनराइझर्स हैदराबादने 3.20 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्सकडून खेळत होता.
24 Nov, 24 09:10 PM
प्रसीध कृष्णाला मिळाला नवीन संघ
भारताचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला नवा संघ मिळाला आहे. गेल्या मोसमात राजस्थानचा भाग असलेला प्रसिध आता शेजारील राज्य गुजरातच्या संघाचा भाग असेल. गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी 9.50 कोटी रुपये खर्च केले.
24 Nov, 24 09:09 PM
ट्रेंट बोल्ट मुंबईत परतला
मुंबई इंडियन्सने अखेर त्यांचे खाते उघडले. फ्रँचायझीने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला 12.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. बोल्ट 3 हंगामापूर्वी मुंबईचा भाग होता आणि त्याने संघासाठी विजेतेपद पटकावले होते.
24 Nov, 24 08:49 PM
जोफ्रा आर्चरची राजस्थानमध्ये वापसी
जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये परतला आहे. काही वर्षांपूर्वी राजस्थानकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर्चरला फ्रँचायझीने 12.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
24 Nov, 24 08:49 PM
टी नटराजन दिल्लीच्या ताफ्यात
भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनसाठी आरसीबी आणि दिल्ली यांच्यात चुरशीची स्पर्धा होती, पण शेवटी दिल्लीने नटराजनला 11.75 कोटींना विकत घेतले.
24 Nov, 24 08:19 PM
प्रसीध कृष्णाला मिळाला नवीन संघ
भारताचा युवा गोलंदाज प्रसिध कृष्णाला नवा संघ मिळाला आहे. गेल्या मोसमात राजस्थानचा भाग असलेला प्रसिध आता शेजारील राज्य गुजरातच्या संघाचा भाग असेल. गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी 9.50 कोटी रुपये खर्च केले.
24 Nov, 24 08:10 PM
युझवेंद्र चहलवर पैशांचा पाऊस
टीम इंडियाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलसाठी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादने मोठी बोली लावली होती. शेवटी पंजाब किंग्जने युझवेंद्र चहलवा १८ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.
24 Nov, 24 08:03 PM
मुंबईचा इशान किशन आता हैदराबादच्या ताफ्यात
भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने बोली सुरू केली, पण यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने उडी घेतली. अखेर इशान किशनला हैदराबादने 11.25 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
24 Nov, 24 07:57 PM
फिल सॉल्ट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टला विकत घेतले आहे. केकेआर बरोबरच्या संघर्षानंतर बंगळुरूने सॉल्टला ११.५० कोटी रुपयांना विकत घेतले.
24 Nov, 24 07:32 PM
ग्लेन मॅक्सवेल पंजाबमध्ये परतला
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा पंजाबमध्ये परतला आहे. पंजाबने मॅक्सवेलला ४.२० कोटींना विकत घेतले.
24 Nov, 24 07:32 PM
मार्कस स्टॉइनिसला पंजाबने विकत घेतले
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्जने ११ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले आहे.
24 Nov, 24 07:17 PM
व्यंकटेश अय्यरसाठी जोरदार बोली
कोलकाताने व्यंकटेशला विकत घेण्यात बाजी मारली आहे. व्यंकटेशला पुन्हा केकेआरने २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
24 Nov, 24 07:01 PM
रविचंद्रन अश्विन चेन्नईच्या संघामध्ये
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला आहे. चेन्नईने अश्विनसाठी सर्वाधिक ९.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं
24 Nov, 24 06:59 PM
रचिन रवींद्र पुन्हा सीएसकेमध्ये परतला
पंजाब किंग्सने न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू रचिन रवींद्रसाठी ३.२० कोटी रुपयांची बोली लावली होती. पंजाबने पुन्हा ४ कोटींची बोली लावल्यानंतर चेन्नईनेही बरोबरी साधली. अशाप्रकारे रवींद्र ४ कोटी रुपयांमध्ये सीएसकेकडे परतला.
24 Nov, 24 06:57 PM
डेव्हिड वॉर्नर अनसोल्ड
लिलावात पहिल्यांदाच अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी कोणीही बोली लावली नाही. मात्र, त्यांच्यावर पुन्हा बोली लावली जाऊ शकते.
24 Nov, 24 06:50 PM
राहुल त्रिपाठी चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील
भारतीय फलंदाज राहुल त्रिपाठीलाही चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे. राहुलला चेन्नईने अवघ्या ३.४० कोटींमध्ये खरेदी केले.
24 Nov, 24 06:49 PM
डेव्हॉन कॉनवे पुन्हा चेन्नईमध्ये सामील
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवे याला चेन्नई सुपर किंग्जने ६.२५ कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. कॉनवे हा यापूर्वीही चेन्नईचा भाग होता.
24 Nov, 24 06:38 PM
एडन मार्करामची बेस प्राईजवर विक्री
दक्षिण आफ्रिकेचा टी२० कर्णधार एडन मार्कराम केवळ २ कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर लखनऊ सुपर जायंट्सचा भाग बनला आहे. मार्कराम हा यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.
24 Nov, 24 06:35 PM
हॅरी ब्रूक दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकसाठी जोरदार बोली लागली होती. पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने बोली जिंकली. दिल्लीने त्याला पुन्हा ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.
24 Nov, 24 05:30 PM
दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला विकत घेतले
केएल राहुलवरही जोरदार बोली लावण्यात आली होती. पण या स्टार भारतीय फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या १४ कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी राहुलला लखनऊमध्ये १७ कोटी रुपये मिळत होते.
24 Nov, 24 05:24 PM
लियाम लिव्हिंगस्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे
इंग्लंडचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टनला नवा संघ सापडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ८.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
24 Nov, 24 05:23 PM
मोहम्मद सिराजला गुजरातने घेतले विकत
मोहम्मद सिराजला नवीन संघ मिळाला असून गुजरात टायटन्सने त्याला १२.२५ कोटी रुपयांची जोरदार बोली लावून खरेदी केले आहे. आरसीबीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही.
24 Nov, 24 05:12 PM
युझवेंद्र चहलवर पैशांचा पाऊस
टीम इंडियाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलसाठी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादने मोठी बोली लावली होती. शेवटी पंजाब किंग्जने युझवेंद्र चहलवा १८ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.
24 Nov, 24 05:06 PM
डेव्हिड मिलरची लखनौमध्ये एन्ट्री
डेव्हिड मिलरला एक नवीन संघ मिळाला असून त्याला लखनौ सुपर जायंट्सने 7.50 कोटी रुपयांना बोली लावली.
24 Nov, 24 05:05 PM
डेव्हिड मिलरवर बोली
डेव्हिड मिलर - 1.50 कोटी मूळ किंमत
गुजरात टायटन्सने दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज मिलरसाठी बोली लावली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही त्याला तगडी स्पर्धा देत आहे.
सध्या आरसीबीने ५ कोटींची बोली लावली आहे
दिल्लीत प्रवेश करून तो 6 कोटींच्या पुढे नेला आहे.
लखनौ सुपर जायंट्सने 7.50 कोटी रुपयांची अंतिम बोली लावली.
24 Nov, 24 05:04 PM
IPL Auction Live: मोहम्मद शमीची हैदराबादमध्ये एन्ट्री
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे. हैदराबादने शमीला सर्वाधिक १० कोटींची बोली लावून विकत घेतले.
24 Nov, 24 04:56 PM
मोहम्मद शमीची २ कोटी बेसेस प्राईस
मोहम्मद शमी - 2 कोटी मूळ किंमत
कोलकाताने शमीसाठी बोली लावली.
चेन्नईनेही या शर्यतीत प्रवेश केला आहे.
बोलीने 6 कोटींचा टप्पा ओलांडला आहे
चेन्नईने पराभव स्वीकारला
लखनऊची 8.50 कोटींची एंट्री
आता सनरायझर्स हैदराबादची एंट्री 9.75 कोटींवर आहे
24 Nov, 24 04:54 PM
IPL Auction Live: ऋषभ पंत बनला सर्वात महागडा खेळाडू
IPL Auction Live: ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला सर्वाधिक 27 कोटी रुपयांची बोली लावली. पंतने अशा प्रकारे श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला, काही मिनिटांपूर्वी पंजाबने 26.75 हा करार झाला.
24 Nov, 24 04:40 PM
IPL Auction Live: ऋषभ पंत - 2 कोटी बेस प्राइस
आरसीबीने पंतसाठी बोली लावली
लखनौही आले
बोली वेगाने 10 कोटींवर पोहोचली आहे.
SRH 11 कोटींनंतर दाखल झाला आहे
SRH आणि LSG यांच्यात जोरदार बोली, बोलीने 19 कोटी रुपयांचा टप्पा पार केला
पंतवरची बोली 20 कोटींवर पोहोचली आहे
हैदराबाद शर्यतीतून बाहेर आहे
24 Nov, 24 04:32 PM
IPL Auction Live: मिचेल स्टार्कवर बोली
IPL Auction Live: मिचेल स्टार्क - 2 कोटी मूळ किंमत
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता यांच्यात बोली सुरू झाली
मुंबईने 5 कोटींनंतर मागे हटण्याचा निर्णय घेतला
आता दिल्ली दाखल झाली असून बोली 8 कोटींवर पोहोचली आहे.
24 Nov, 24 04:31 PM
IPL Auction Live: बटलर गुजरातच्या ताफ्यात
IPL Auction Live: इंग्लंडचा T20-ODI कर्णधार जोस बटलरला गुजरात टायटन्सने 15.75 कोटी रुपयांची जोरदार बोली लावली.
24 Nov, 24 04:11 PM
IPL Auction Live: आता श्रेयस अय्यरवर 2 कोटी बेस प्राइस
केकेआरने आपल्या कर्णधारासाठी बोली लावली.
पंजाब किंग्सनेही शर्यतीत प्रवेश केला
7.50 कोटींच्या बोलीसह दिल्लीची एंट्री
दिल्लीने 10 कोटींची बोली लावली, कोलकाता बाहेर
आता पंजाब पुन्हा परतला आहे
बोलीने 15 कोटींचा आकडा पार केला आहे, पंजाब आणि दिल्लीत स्पर्धा सुरू आहे.
श्रेयस अय्यरवरील बोली 20 कोटींच्या पुढे गेली आहे, म्हणजेच तो आता सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनला आहे.
पंजाब-दिल्ली सोडायला तयार नाहीत आणि बोली 23 कोटींवर पोहोचली आहे.
दिल्लीने श्रेयसवर 25 कोटींची बोली लावली असून यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
दिल्लीने 26.50 कोटींच्या पुढे बोली लावली आहे.
24 Nov, 24 04:11 PM
IPL Auction Live: गुजरातने रबाडाला विकत घेतले
IPL Auction Live: गुजरात टायटन्सने पहिला खेळाडू विकत घेतला असून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा प्रवेश झाला आहे. गुजरातने रबाडाला सर्वाधिक 10.75 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले.
24 Nov, 24 04:07 PM
श्रेयस अय्यर- 2 कोटी बेस प्राइस
श्रेयस अय्यर- 2 कोटी बेस प्राइस
केकेआरने आपल्या कर्णधारासाठी बोली लावली.
24 Nov, 24 04:05 PM
IPL Auction Live: गुजरातने रबाडाला विकत घेतले
गुजरात टायटन्सने पहिला खेळाडूचा करार झाला असून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा प्रवेश झाला आहे. गुजरातने रबाडाला सर्वाधिक 10.75 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले.
24 Nov, 24 04:04 PM
IPL Auction Live: कागिसो रबाडावर बोली
कागिसो रबाडा - 2 कोटी मूळ किंमत
आरसीबीने बोली सुरू केली, त्यानंतर गुजरातने स्पर्धा केली.
आता मुंबई इंडियन्सनेही प्रवेश केला असून तीन संघांमध्ये स्पर्धा सुरू आहे.
बोली 10 कोटींच्या पुढे गेली
24 Nov, 24 04:02 PM
पहिली बोलीअर्शदीप सिंहवर
लिलावाची सुरुवात मार्की खेळाडूंपासून होत असून अर्शदीप सिंहवर पहिली बोली लावली जाणार आहे. अर्शदीपची मूळ किंमत 2 कोटी आहे. चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली आणि दिल्ली कॅपिटल्सनेही बोली लावली.
24 Nov, 24 04:02 PM
अर्शदीप पंजाब पंजाब किंग्जमध्ये
अर्शदीप सिंह पुन्हा एकदा पंजाब किंग्जमध्ये परतला आहे. पंजाबने सनरायझर्स हैदराबादच्या १८ कोटी रुपयांच्या बोलीवर आरटीएमचा वापर केला आणि अर्शदीपला घेतला. यासह तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
24 Nov, 24 03:50 PM
IPL Auction Live: पहिली बोलीअर्शदीप सिंहवर
IPL Auction Live: लिलावाची सुरुवात मार्की खेळाडूंपासून होत असून अर्शदीप सिंहवर पहिली बोली लावली जाणार आहे. अर्शदीपची मूळ किंमत 2 कोटी आहे. चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली आणि दिल्ली कॅपिटल्सनेही बोली लावली.
चेन्नईच्या बाहेर पडल्यानंतर, गुजरात टायटन्सचा प्रवेश, दिल्ली स्पर्धेत कायम आहे. RCB 10 कोटींसह दाखल, दिल्ली बाहेर, गुजरात शर्यतीत.
राजस्थान रॉयल्स देखील ११ कोटी रुपयांसह शर्यतीत सामील आहे. गुजरातही बाहेर पडला आणि आता हैदराबादने १३ कोटींची बोली लावून शर्यतीत प्रवेश केला आहे.
बोली १५ कोटींच्या पुढे, राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा
SRH ने सर्वाधिक १५.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती पण पंजाबने या बोलीवर RTM लावला.
24 Nov, 24 03:43 PM
IPL Auction Live: या वर्षी लिलाव कोण करणार?
या वर्षी लिलावाची जबाबदारी मल्लिका सागर सांभाळत आहेत. गेल्या हंगामातील मिनी लिलावही त्यांनी सांभाळला. IPL लिलाव करणारी मल्लिका सागर ही पहिली महिला लिलावकर्ता आहे.
24 Nov, 24 03:43 PM
IPL Auction Live: लिलावाची तयारी पूर्ण
अल जोहर एरिना येथे लिलावाची तयारी पूर्ण झाली असून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या उद्घाटनाच्या भाषणाने लिलावाला दुपारी ३.३० वाजता सुरूवात झाली.