Join us  

गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) काही दिलासादायक बातमी समोर आली आहे, बीसीसीआय हळूहळू पाठिंबा गमावत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 6:30 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) काही दिलासादायक बातमी समोर आली आहे. Asia Cup 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानने सुचवलेला नव्या हायब्रिड प्लानला बांगलादेश आणि श्रीलंका यांनी पाठिंबा दर्शवला आहे. PCB अध्यक्ष नजम सेठी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेकडे ( ACC) नवा प्रस्ताव पाठवला आहे आणि ACC अध्यक्ष जय शाह जे बीसीसीआयचे सचिव आहेत ते पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करतील. पण, बीसीसीआय संपूर्ण आशिया चषक दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि आता टीम इंडियाच या स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Asia Cup वाद : पाकिस्तानी सैरभैर! BCCI ने भिक घातली नाही, आता श्रीलंकेला दिली धमकी

पीसीबीने कोणते प्रस्ताव ठेवलेत? 

  • पहिला -  पाकिस्तानमध्ये सर्व सामने होतील आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील
  • दुसरा - ही स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवली जाईल. पाकिस्तानमध्ये पहिल्या फेरीचे सामने होतील आणि दुसऱ्या टप्प्यात भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. अंतिम सामनाही तटस्थ ठिकाणी होईल

 

“मी प्रस्ताव पाहिलेला नाही. पण आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. ही स्पर्धा यूएईमध्ये नव्हे तर तटस्थ ठिकाणी खेळवली जावी, अशी आमची इच्छा आहे. तिथल्या उष्णतेमुळे खेळाडूंच्या दुखापतीचा धोका आम्ही पत्करू शकत नाही. श्रीलंका या स्पर्धेसाठी सर्वोत्तम आहे. आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याबाबत आत्तापर्यंत आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. प्रथम परिस्थिती समजून घेऊ आणि मग आम्ही निर्णय घेऊ,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले. 

बीसीसीआयने पीसीबीचे "हायब्रीड" मॉडेल नाकारले होते. त्याऐवजी, बीसीसीआयने संपूर्ण स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्यास सांगितले. श्रीलंका क्रिकेटने बीसीसीआयच्या दाव्यांचे समर्थन केले होते, तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पीसीबीला त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका रद्द करण्याची धमकीही पीसीबीने दिली आहे. मात्र, बीसीसीआय हळूहळू पाठिंबा गमावत आहे. GeoTVनुसार, पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलवर SLC आणि BCB कडून पाठिंबा मिळाला आहे. अफगाणिस्तान तटस्थ राहिला परंतु पीसीबीने गेल्या महिन्यात यूएईमध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी त्यांना मदत केली असल्याने पाकिस्तानला त्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानश्रीलंकाबांगलादेश
Open in App