World Cup 2023: राजा उदार झाला! सर्व मॅचच्या वेळी BCCI प्रेक्षकांना मोफत देणार 'ही' गोष्ट

BCCI सचिव जय शाह यांनी स्वत: ट्विटरवरून केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:18 PM2023-10-05T18:18:43+5:302023-10-05T18:19:05+5:30

whatsapp join usJoin us
bcci to give free meinaral drinking water to fans in stadium during world cup 2023 matches jay shah confirms | World Cup 2023: राजा उदार झाला! सर्व मॅचच्या वेळी BCCI प्रेक्षकांना मोफत देणार 'ही' गोष्ट

World Cup 2023: राजा उदार झाला! सर्व मॅचच्या वेळी BCCI प्रेक्षकांना मोफत देणार 'ही' गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Cup 2023, BCCI Jay Shah: भारत आणि क्रिकेट हे नातं कोणालाच नव्याने सांगायची गरज नाही. भारतात आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची प्रत्येक क्रिकेट चाहता वाट पाहात होता. अखेर आज इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या सामन्याने विश्वचषकाची सुरूवात झाली. गत विश्वचषकातील अंतिम फेरीच्या संघांनी ही स्पर्धा सुरू झाली. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने स्वत: विश्वचषक मैदानात आणला आणि स्पर्धेची सुरूवात झाली. या स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास गिफ्ट देणार असल्याची घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबद्दलची घोषणा केली.

जय शाहांच्या ट्विटनुसार, विश्वचषकादरम्यान चाहत्यांना सर्व ठिकाणी मिनरल पाणी आणि पॅकेज्ड पिण्याचे पाणी मोफत दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. साधारणपणे एखाद्या सामन्यात स्टेडियमच्या आत पिण्याचे पाणी घेऊन जाण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नसते. तसेच तेथे मिळणारे पाणी हे सर्वसामान्य दरापेक्षा खूप महाग विकले जाते. अशा वेळी बीसीसीआयने मुलभूत गरजेची गोष्ट असलेले पाणी मोफत उपलब्ध करून दिल्याने चाहत्यांना नक्कीच फायदा होईल, अशी भावना आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शाह यांनी ट्विट केले, "बहुप्रतिक्षित आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी सारे सज्ज आहेत. मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, आम्ही भारतभरातील स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मिनरल आणि पॅकेज पिण्याचे पाणी मोफत देत आहोत. हायड्रेटेड रहा आणि खेळांचा आनंद घ्या! CWC 2023 दरम्यान अविस्मरणीय आठवणी निर्माण करूया!"

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम, चिदंबरम स्टेडियम, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम, धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोलकातातील ईडन गार्डन, लखनौमधील एकना क्रिकेट स्टेडियम, मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम अशा भारतातील 10 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत वाटले जाणार आहे.

Web Title: bcci to give free meinaral drinking water to fans in stadium during world cup 2023 matches jay shah confirms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.