IND vs SA 3rd ODI (Marathi News) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात लोकेश राहुल व संजू सॅमसन यांच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला सावरले. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे रजत पाटीदार व साई सुदर्शन आज सलामीला आले. या दोघांनी ४.४ षटकांत ३४ धावा फलकावर चढवल्या, परंतु नांद्रे बर्गरने पहिला धक्का दिला. आजच्या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदार ( Rajat Patidar ) याने १६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २२ धावा केल्या. फलंदाजीत फार कमाल करू शकला नसला तरी पदार्पणाची कॅप हाती येताच रजतला लॉटरी लागली.
ऋतुराज गायकवाडची कसोटी मालिकेतूनही माघार? BCCI ने दिले मेडिकल अपडेट्स
IND vs SA 3rd ODI सामन्यात रजतने पदार्पण केले आणि आयपीएलच्या नव्या नियमाचा लाभार्थी घेणारा पहिला खेळाडू ठरला. ३० वर्षीय रजतला बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ३० लाख रुपये द्यावे लागणार आहेत. BCCI च्या नियमानुसार आयपीएलच्या दोन पर्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूला आता रिवॉर्ड मिळणार आहे. आधीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला फ्रँचायझीने खरेदी केल्यास त्याची फी ही ३ वर्षांसाठी तेवढीच राहते किंवा त्याला रिलीज केल्यानंतर अन्य फ्रँचायझीने घेतल्यावर त्यात वाढ होते. पण, आता अनकॅप खेळाडूची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढू शकते. जर अनकॅप खेळाडू आयपीएलच्या दोन पर्वांमध्ये १० आंतरराष्ट्रीय सामने खेळला तर त्याची फी दुप्पट होते.