कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चितेचं सावट गडद होत चालले आहे. दोन वेळा ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. 17 मे पर्यंतचा लॉकडाऊन पुढे वाढल्यास ही स्पर्धा होईल की नाही, यावरही संभ्रम आहे. पण, आपीएलच्या आयोजनासाठी श्रीलंकेनं उत्सुकता दाखवली होती. त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिराती ( UAE) नंही आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) पाठवला आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ
कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी
ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!
हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना त्यांनी सांगितले की,''संयुक्त अरब अमिरातीकडून आम्हाला आयपीएल 2020च्या आयोजनाचा प्रस्ताव मिळाला आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रवासबंदी आहे, त्यामुळे याबाबत बीसीसीआयनं अजून विचार केलेला नाही. लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची सुरक्षितता हे आमचे प्राधन्य आहे.''
श्रीलंकेनंतर आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव देणारा संयुक्त अरब अमिराती दुसरा देश आहे. धुमाल यांनी सांगितले की,''आयपीएल 2020 न झाल्यास बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसेल. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट लवकर सुरू न झाल्यासही आर्थिक नुकसान होईल.''
2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. 2014मध्ये आयपीएलचे 20 सामने संयुक्त अरब अमिरातीत झाले होते. अबु धाबी, दुबई आणि शाहजाह येथे 2014मध्ये आयपीएल सामने खेळवण्यात आले होते. आयपीएल स्पर्धेबरोबरच यंदाच्या आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावटं आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न झाल्यास त्या काळात आयपीएल खेळवण्याचा विचारही सुरू आहे.
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?