Join us  

IPL 2018 : बीसीसीयनं फेटाळला आयसीसीचा आग्रह

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव गोपनीय ठेवण्याच्या शर्तीवर सांगितले की

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 6:36 PM

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयने कोलकात्यामध्ये २२ ते २६ एप्रिलदरम्यान होणा-या आयसीसी वार्षिक बोर्डाच्या बैठकीदरम्यान या शहरात आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याचा आग्रह फेटाळला आहे. आयसीसी प्रदीर्घ कालावधीनंतर कोलकात्यामध्ये बैठक घेत आहे. ही बैठक आयपीएल टूर्नामेंटदरम्यान होणार आहे.  यासाठी जागतिक संस्थेला अपेक्षित आहे की त्यांच्या सदस्यांना कमीत कमी कोलकाता नाईट रायडर्सच्या एखाद्या सामन्याचा आनंद तरी लुटता यावा. 

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव गोपनीय ठेवण्याच्या शर्तीवर सांगितले की, आयसीसीकडून आयपीएल कार्यक्रम बदलण्याचा विशेष आग्रह होता, कारण त्यांच्या प्रतिनिधींना आयपीएलचा एक सामना तरी पाहता यावा; मात्र २२ ते २६ एप्रिलदरम्यान केकेआर आणि ईडन गार्डन्समध्ये कोणताही सामना होणार नाही़.  केकेआर आपला घरेलू सामना १६ एप्रिलला खेळणार आहे. आणि त्यानंतर ईडन गार्डन्सवर त्याचा पुढील सामना ३ मे रोजी होणार आहे़ तर २२ ते २६ एप्रिलदरम्यान हैदराबाद, मुंबई, इंदौर, बंगळुरु आणि जयपूरमध्ये सामने होतील़ अधिका-याने सांगितले की, जर आम्ही कार्यक्रम बदललो तर याचा परिणाम संपूर्ण सामन्यांच्या कार्यक्रमावर होणार आहे. यासाठी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे, की एका सामन्यासाठी कार्यक्रम बदलणे शक्य होणार नाही. 

पाहा स्पर्धेतील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक  1) मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज - 7 एप्रिल, मुंबई2) दिल्ली डेअसडेव्हिलस वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 एप्रिल, दिल्ली 3) कोलकाता नाईटरायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 एप्रिल - कोलकाता4) सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 9 एप्रिल, हैदराबाद 5) चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकाता नाईटरायडर्स - 10 एप्रिल, चेन्नई 6) राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेव्हिलस - 11 एप्रिल, जयपूर7) सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 12 एप्रिल, हैदराबाद8) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 13 एप्रिल, बंगळुरू 9) मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 14 एप्रिल, मुंबई 10) कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 14 एप्रिल, कोलकाता11) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 15 एप्रिल, बंगळुरू 12) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 15 एप्रिल, इंदूर 13) कोलकाता नाईटरायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल- 16 एप्रिल, कोलकाता 14) मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर बंगळुरू - 17 एप्रिल, मुंबई 15) राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 18 एप्रिल, जयपूर16) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद- 19 एप्रिल, इंदूर 17) चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - 20 एप्रिल, चेन्नई 18) कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -21 एप्रिल, कोलकाता19) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 21 एप्रिल, दिल्ली 20) सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 22 एप्रिल, हैदराबाद 21) राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - 22 एप्रिल, जयपूर22) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 23 एप्रिल, इंदूर 23 मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 24 एप्रिल, मुंबई 24) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 25 एप्रिल, बंगळुरू 25) सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 26 एप्रिल, हैदराबाद 26) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 27 एप्रिल, दिल्ली 27) चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स - 28 एप्रिल. चेन्नई 28) राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 29 एप्रिल, जयपूर 29) रॉयल चॅलेंजर बंगळुरू वि. कोलकाता नाइटरायडर्स - 29 एप्रिल, बंगळुरू 30) चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 30 एप्रिल, चेन्नई31) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - 1 मे, बंगळुरू 32) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. राजस्थान रॉयल्स - 2 मे, दिल्ली 33) कोलकाता नाईटरायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 3 मे, कोलकाता 34) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स - 4 मे, मोहाली35) चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 मे, चेन्नई 36) सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 मे, हैदराबाद37) मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 6 मे, मुंबई 38) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - 6 मे, मोहाली39) सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 7 मे, हैदराबाद40) राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 मे, जयपूर 41) कोलकाता नाईटरायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 9 मे, कोलकाता42) दिल्ली डेअरडेव्हिस वि. सनरायझर्स हैदराबाद - 10 मे, दिल्ली43) राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 11 मे, जयपूर 44) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइटरायडर्स - 12 मे, मोहाली45) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 12 मे, बंगळुरू 46) चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद - 13 मे, चेन्नई 47) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 13 मे, मुंबई 48) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  - 14 मे, मोहाली49) कोलकाता नाईटरायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - 15 मे, कोलकाता 50) मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 16 मे, मुंबई 51) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद - 17 मे, बंगळुरू 52) दिल्ली डेअरडेव्हिस वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 18 मे, दिल्ली 53) राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 19 मे, जयपूर 54) सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइटरायडर्स - 19, हैदराबाद55) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स - 20 मे, दिल्ली 56) चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 20 मे, चेन्नई 

क्वालिफायर/ एलिमिनेटर फेरी57) क्वालिफायर 1 -  22 मे, मुंबई 58) एलिमिनेटर - 23 मे59) क्वालिफायर 2 -  24 मे 60 अंतिम लढत -  27 मे, मुंबई 

टॅग्स :आयपीएल 2018आयसीसीबीसीसीआय