Join us  

भारत-पाक मालिकेबाबत नीती स्पष्ट करावी, बीसीसीआयचा सरकारकडे आग्रह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्र सरकारला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत आपली नीती अधिकृतपणे स्पष्ट करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 4:59 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्र सरकारला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत आपली नीती अधिकृतपणे स्पष्ट करावी, अशी विनंती केली आहे. या दोन शेजारी देशांदरम्यान राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१२ पासून कुठलीही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही.सरकारकडून मंजुरी मिळाल्याशिवाय द्विपक्षीय मालिका खेळणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे.जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्डाला आयसीसी तक्रार निवारण मंचावर जाण्यापूर्वी सरकारकडून अधिकृतपणे संदेश अपेक्षित आहे. बीसीसीआयला आयसीसी तक्रार निवारण मंचामध्ये पीसीबीच्या सात कोटी डॉलरच्या नुकसानभरपाईबाबत आपली बाजू मांडायची आहे. पीसीबीने २०१४ मध्ये उभय बोर्डांदरम्यान झालेल्या कराराचा आदर न राखल्यामुळे हा दावा ठोठावला आहे.बीसीसीआयने अलीकडेच मंत्रालयाला लिहिले, ‘भारत-पाक मालिकेबाबत स्वदेश व विदेशात खेळण्याबाबत भारत सरकारने आपली नीती स्पष्ट केली तर बीसीसीआय आभारी राहील.’या ई-मेलबाबत विचारले असता बीसीसीआयचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘हा बीसीसीआयतर्फे नियमित पत्रव्यवहार आहे. द्विपक्षीय मालिकेसाठी सरकारकडून परवानगी घेणे आमचे कर्तव्य आहे. आमचे काम विचारणा करण्याचे असून निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. आमच्या मते सध्याच्या स्थितीत द्विपक्षीय मालिका आयोजित होणे कठीण आहे, पण सरकारकडून उत्तर मिळाले तर आम्हाला त्याची मदत होईल.’पीसीबीने आयसीसी तक्रार निवारण समितीकडे अपील केले असून बीसीसीआयवर भविष्य दौरा कार्यक्रमाचा (एफटीपी) आदर राखला नसल्याचा आरोप केला आहे. एफटीपीनुसार भारताला पाकिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातसारख्या तटस्थ स्थळावर दोन मालिका खेळणे आवश्यक आहे.आयसीसीने स्पष्ट केले, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व भारतीय क्रिकेट बोर्डांदरम्यान सुरू असलेल्या प्रकरणात मायकल बेलोफ क्युसी समितीचे नेतृत्व करतील. समितीमध्ये अन्य दोन सदस्यांचा समावेश राहणार आहे. त्यात जॉन पॉलसन व डॉ.अनाबेल बेनेट एओ, एससी राहतील.’विश्व क्रिकेटचे संचालन करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने याचसोबत स्पष्ट केले, की समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येणार नाही.

टॅग्स :क्रिकेटभारतपाकिस्तानबीसीसीआय