हार्दिक पांड्याच्या 'फिटनेस'वर BCCI ला भरवसा नाही; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बॅकअप खेळाडू तयार

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय व संघ व्यवस्थापन कामाला लागले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:26 PM2024-01-16T12:26:03+5:302024-01-16T12:26:20+5:30

whatsapp join usJoin us
BCCI wants Shivam Dube to bowl more due to uncertainties regarding Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या 'फिटनेस'वर BCCI ला भरवसा नाही; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बॅकअप खेळाडू तयार

हार्दिक पांड्याच्या 'फिटनेस'वर BCCI ला भरवसा नाही; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बॅकअप खेळाडू तयार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya Injury ( Marathi News ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय व संघ व्यवस्थापन कामाला लागले आहेत... रोहित शर्मा व विराट कोहली यांचे १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० संघात पुनरागमन हे त्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित व विराट शॉर्ट फॉरमॅटपासून दूर आहेत आणि हार्दिक पांड्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. त्यामुळे जून २०२४ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा होती, परंतु रोहितच्या एन्ट्रीने ती मावळली आहे. त्याचवेळी हार्दिकचा फिटनेस हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन BCCI ने बॅकअप प्लान तयार केला आहे. 

मेहनतीचे फळ! यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांना BCCI मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत  

वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकचा पाय मुरगळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला मुकला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिककडे सोपवण्यात आले खरे, परंतु तो काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या या अनिश्चिततेमुळे बीसीसीआयने बॅकअप म्हणून शिवम दुबेकडे लक्ष वळवले आहे.

Image
अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शिवमने मॅच विनिंग खेळी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद ६० आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद ६३ धावांची  खेळी केली. गोलंदाजीतही त्याने विकेट्स घेतल्या आहे. हार्दिकच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता असल्याने बीसीसीआयने शिवमला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार रोहित शर्माही त्याला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला आणून त्याच्याकडून तयारी करू घेतोय. ''शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 


शिवमने तीन वर्षांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या २०२३च्या मालिकेत त्याची निवड झाली होती. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन झाले. त्याने आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४५.८३च्या सरासरीने २७५ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्सही घेतल्या आहेत.

Web Title: BCCI wants Shivam Dube to bowl more due to uncertainties regarding Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.