Join us  

बीसीसीआयची वेबसाइट पुन्हा सुरू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत वेबसाइट डोमेनचे नूतनीकरण न झाल्यामुळे १८ तासांपर्यंत आॅफलाइन राहिल्यानंतर आज वेबसाइटची सेवा पुन्हा सुरू झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:47 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत वेबसाइट डोमेनचे नूतनीकरण न झाल्यामुळे १८ तासांपर्यंत आॅफलाइन राहिल्यानंतर आज वेबसाइटची सेवा पुन्हा सुरू झाली.जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने आपल्या वेबसाईटच्या नूतनीकरणाचे पैसे भरले नव्हते. या डोमेनला आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी खरेदी केले होते.वेबसाइटची नोंदणी करणाºया रजिस्टर डॉट कॉम आणि नेमजेट डॉट कॉमने या डोमेनच्या नावाला सार्वजानिक बोलीसाठी ठेवले होते आणि त्यावर सात बोली लागल्या होत्या, त्यात सर्वांत मोठी बोली २७0 डॉलरची होती. हे डोमेन २ फेब्रुवारी २00६ पासून ते २ फेब्रुवारी २0१९ पर्यंत कायदेशीर आहे. अपडेट करण्याची तारीख ३ फेब्रुवारी २0१८ होती.बोर्डाची ही वेबसाईट रविवारी सायंकाळपर्यंत चालू होऊ शकली नव्हती. सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे त्या वेळेस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे दुसरा वनडे खेळत होता.

टॅग्स :बीसीसीआय