48,390.52 crores for IPL 2023-27 media rights : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधी झालेल्या ई लिलावात चार पॅकेजसाठी ४८, ३९०.५२ कोटींची विक्रमी बोली लागली. BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीत आयपीएल कोणत्या चॅनेलवर टीव्हीवर पाहता येणार, डिजिटल प्लॅटफॉर्म कोणते असणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर आज मिळाली. रिलायन्सचे मालकी हक्क असलेल्या Viacom18 ने अनपेक्षित मुसंडी मारताना डिजिटल क्रांती घडवली.
जय शाह यांनी ट्विट केले की,''आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये एक क्रांती घडवली आहे. पुढील पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी झालेल्या ई लिलावात ४८,३९० कोटींची बोली लागली आहे. प्रती सामन्यांच्या मुल्यांकनात आता आयपीएल जगातील दुसरी सर्वात श्रीमंत लीग ठरली आहे. STAR INDIA ने भारतातील टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क जिंकले आहेत. त्यासाठी त्यांनी २३,५७५ कोटी रुपये मोजले आहेत.''
''Viacom18 ने २३,७५८ कोटींत डिजिटल हक्क जिंकले आहेत. भारत डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असताना हे मोठे यश म्हणावे लागेल,''असे ट्विट जय शाह यांनी केले.
रिलायन्सची मालकी हक्क असलेल्या Viacom18 ने पॅकेज बी पाठोपाठ पॅकेज सी हेही जिंकले आहे.
बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज कोणकोणते?
यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.
- पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
- पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
- पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात ८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
- पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी
एकूण मूल्य
Package A: २३,५७५ कोटी ( ५७.४० कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने ) - Star
Package B: २०,५०० कोटी ( ५७ कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने ) - Viacom
Package C: २,९९१ कोटी ( ३३.२४ कोटी प्रती सामना, एकूण ९८ सामने) - Viacom
Package D: १३२४ कोटी - Viacom & Times Internet
Web Title: BCCI will be earning 48,390cr through IPL Media Rights in the next 5 years, STAR INDIA wins India TV rights with Rs 23,575 crores and Viacom18 bags digital rights with Rs 23,758 cr
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.