नवी दिल्ली : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. खरं तर बीसीसीआयला यावेळीचा आयपीएल हंगाम लांबवायचा होता, मात्र त्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. त्यांच्या नियोजनातील 14 दिवसांची कपात करण्यात आली आहे. खरं तर बीसीसीआयने आयपीएल 2023 74 दिवस चालवण्याची योजना आखली होती, परंतु त्यांचे नियोजन सध्यातरी थांबवावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचा पुढचा हंगाम फक्त 60 दिवसांचा असेल. BCCI ने आयपीएलच्या आगामी हंगामाची तारीख अद्याप जाहीर केली नाही. मात्र, ही स्पर्धा 1 एप्रिलपासून सुरू होऊ शकते आणि 31 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे बीसीसीआयच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेच्या 7 दिवस आधी आणि नंतर कोणतीही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकत नाही. आयपीएलचा आगामी हंगाम याच कारणामुळे 60 दिवसांचा असणार आहे, कारण महिला आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार आहे.
3 महिन्यांत 2 आयपीएल करण्याचे आव्हानइनसाइड स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे महिला आयपीएल आणि पुरुष आयपीएल आयोजित करण्यासाठी फक्त 3 महिन्यांचा कालावधी आहे. याची अद्याप तारीख ठरलेली नाही.
पुरूष आयपीएलसाठी 2 महिन्यांचा कालावधी महिला आयपीएलचे आयोजन करून दोन महिन्यांत पुरूषांच्या आयपीएलचे आव्हान करणे हे बीसीसीआयसमोर मोठे आव्हान असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांच्याकडे 2.5 महिन्यांचा कालावधी आहे, परंतु आता बोर्डासमोर वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"