Hardik Pandya, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) रविवारी मोठ्या धुमधडाक्यात जर्सीचे अनावरण केले. कर्णधार हार्दिक पांड्यासह अनेक स्टार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळयाला २४ तास उलटत नाही, तोच गुजरात टायटन्सला धक्का देणारे वृत्त हाती आली आहे. हार्दिक पांड्याच्याआयपीएल २०२२ त खेळण्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि त्याला कारणीभूत ठरतोय तो BCCI ने घेतलेला पवित्रा.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या जोपर्यंत तंदुरूस्ती चाचणीत उतीर्ण ठरत नाही, तोपर्यंत त्याला आयपीएल २०२२ खेळण्याची परवानगी देणार नसल्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. हार्दिक BCCIच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल झाला आहे आणि येथे पुढील काही दिवस त्याच्या तंदुरूस्तीची चाचणी घेतली जाईल. सर्वकाही ठिक राहिले तरच हार्दिक आयपीएल २०२२ त खेळू शकतो.
''हार्दिक पुढील दोन दिवस NCAमध्ये असणार आहे आणि येथे त्याला वेगवेगळ्या तंदुरूस्तीच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तो BCCIचा करारबद्ध खेळाडू आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर तो क्रिकेट खेळलेला नाही, ''असे BCCIच्या सूत्रांनी PTI ला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
ते पुढे म्हणाले,''त्याला तंदुरूस्ती चाचणीत पास व्हावे लागेल आणि ते अनिवार्य केले गेले आहे. मागील वर्षी श्रेयस अय्यरलाही आयपीएलपूर्वी ही चाचणी द्यावी लागली होती. त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती.'' हार्दिकने गुजरात टायटन्सच्या बडोदा येथे झालेल्या पाच दिवसांच्या सराव शिबिरात गोलंदाजी केल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले होते. पण, त्याची फलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कामगिरी यावरून त्याची तंदुरूस्ती ठरवली जाईल.
गुजरात टायटन्स: शुभमन गील, हार्दिक पांड्या, राशिद खान, , मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी), राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख)