जय शाह, आशिष शेलार यांच्यासह BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! दैनिक भत्त्यात भरघोस वाढ

जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI ने त्यांच्या अधिकार्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:26 PM2023-04-10T17:26:50+5:302023-04-10T17:27:29+5:30

whatsapp join usJoin us
BCCI will now be paid 82000 Rupees per day to BCCI's office bearers like BCCI president, secretary, vice president, treasurer and joint president on foreign tours and they will also get to fly only first class in flights.  | जय शाह, आशिष शेलार यांच्यासह BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! दैनिक भत्त्यात भरघोस वाढ

जय शाह, आशिष शेलार यांच्यासह BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! दैनिक भत्त्यात भरघोस वाढ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI ने त्यांच्या अधिकार्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सरचिटणीस यांच्या परदेश दौऱ्यासह रोचजा खर्च ८२ हजार इतका वाढवण्यात आला आहे. शिवाय या सर्वांना आता विमानातून प्रथम श्रेणीतून प्रवास करता येणार आहे आणि तोही खर्च BCCI उचलणार आहे. BCCIची कालच बैठक पार पडली आणि त्यात हा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर २०२३ पासून होणार आहे. सात वर्षांनातर बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना ७५० डॉलर दैनिक भत्ता मिळायचा. 


BCCI तिजोरीच्या चाव्या भाजपा नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्याकडे आहेत. आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतही उतरले आहेत, परंतु आता त्यांनी BCCI चे खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली.  सौरव गांगुलीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे विराजमान झाले आहेत. जय शाह हे सचिवपदी कायम आहेत. बीसीसीआयला आयपीएल २०२३ मधून कोट्यवधींचा नफा झालेला आहे. शिवाय महिला प्रीमिअर लीगही हिट ठरल्याने त्यांच्या तिजोरीत आणखी भर पडली आहे.   


प्रतीदिन मिळणारा भत्ता
- परदेश दौऱ्यासाठी - ८२ हजार 
- मिटींगसाठी - ४० हजार  
- कामानिमित्त प्रवास - ३० हजार
- देशांतर्गत प्रवास - ३० हजार 

बीसीसीआयची नवी टीम - अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक), सचिव - जय शाह ( गुजरात), उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश), खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र), सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम), आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश).

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: BCCI will now be paid 82000 Rupees per day to BCCI's office bearers like BCCI president, secretary, vice president, treasurer and joint president on foreign tours and they will also get to fly only first class in flights. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.