Join us  

TATA IPL : 'टाटा'मुळे बीसीसीआयला मोठी लॉटरी; IPL Title sponsorship मधून दोन वर्षांत कमावणार तगडी रक्कम

Tata IPL Title sponsorship - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील दोन पर्वासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आता TATA चं नाव दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 5:48 PM

Open in App

Tata IPL Title sponsorship - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील दोन पर्वासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आता TATA चं नाव दिसणार आहे. चीनी कंपनी VIVO नं मघार घेतल्यामुळे TATAची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयला ही डील मालामाल करणारी ठरली आहे. दोन वर्षांत बीसीसीआय तगडी रक्कम कमावणार आहे. 

चायनीझ कंपनी VIVOनं २०१८मध्ये प्रती वर्ष ४४० कोटी यानुसार पाच वर्षांकरीता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. २०२०मध्ये चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता BCCIनं VIVOला माघार घेण्यास सांगितली होती आणि Dream 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. Dream 11नं २२२ कोटींमध्ये २०२०चं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती. 

''Vivo नं त्यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही TATA चा टायटल स्पॉन्सर करण्याचा विचार करत आहोत. Vivoचा दोन वर्ष अजूनही करार बाकी आहे आणि त्यामुळे या पुढील दोन वर्षांसाठी TATA टायटल स्पॉन्सर असतील,'' अशी आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ANI ला दिली. 

पुढील दोन वर्षांत बीसीसीआय कमावणार ११२४ कोटी

  • हक्क शुल्क - ३०१ ( २०२२) + ३०१ ( २०२३) = एकूण ६०२ कोटी
  • अतिरिक्त सामन्यांसाठी वाढीव शुल्क - ३४ कोटी ( २०२२) + ३४ कोटी ( २०२३) = ६८ कोटी
  • Vivoकडून मिळणारी रक्कम - १८३ कोटी ( २०२२) + २११ कोटी ( २०२३) = ३९४ कोटी
  • ६% असाइनमेंट फी - Vivo -  २९ कोटी ( २०२२) + ३१ कोटी ( २०२३) = ६० कोटी
  • बीसीसीआयला मिळणार एकूण ११२४ कोटी

 आतापर्यंत कोण कोण होते टायटल स्पॉन्सर्स

  • २००८ ते २०१२ - DLF IPL ( ४० कोटी प्रती वर्ष) 
  • २०१३ ते २०१५ - Pepsi IPL ( ७९.३ कोटी प्रती वर्ष)
  • २०१६ ते २०१७ - Vivo IPL ( १०० कोटी प्रती वर्ष)
  • २०१८ ते २०१९ - Vivo IPL ( ४३९.८ कोटी प्रती वर्ष)
  • २०२० - Dream 11 IPL ( कोटी प्रती वर्ष)  
  • २०२१ - Vivo IPL ( ४३९.८ कोटी प्रती वर्ष)
  • २०२२ ते २०२३ - TATA IPL
टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयटाटा
Open in App