Join us  

बीसीसीआय घटनेचा मसुदा सोपविणार , लोढा समिती शिफारशींचा समावेश

प्रशासकांच्या समितीने (सीओए) लोढा समितीच्या शिफारशींचा समावेश करीत बीसीसीआयच्या घटनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून ११ सप्टेंबर रोजी (सोमवारी) हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात येणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:40 AM

Open in App

नवी दिल्ली : प्रशासकांच्या समितीने (सीओए) लोढा समितीच्या शिफारशींचा समावेश करीत बीसीसीआयच्या घटनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून ११ सप्टेंबर रोजी (सोमवारी) हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात येणार आहे.संघटनेच्या कारभारामध्ये सुसूत्रता यावी यासाठी लोढा समितीच्या मुख्य शिफारशींनुसार एका राज्य एक मत, ७० वर्षे वयाची मर्यादा, कार्यालयामध्ये प्रत्येक तीन वर्षांनंतर ‘कुलिंग आॅफ पिरियड’ यासह कुठलाही मंत्री किंवा प्रशासकीय नोकरीत असलेल्या व्यक्तीला बीसीसीआयचे अधिकारी होता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी सीओएची भेट घेतली. त्याचप्रमाणे पूर्वेकडील प्रतिनिधींसोबतच्या बैठकीमध्ये नव्या घटनेबाबत चर्चा केली.सीओए प्रमुख विनोद राय यांनी बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की,‘आम्ही आमचे काम पूर्ण केले असून १९ सप्टेंबरला होणाºया पुढील सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडे घटनेचा मसुदा सोपविणार आहोत.’दरम्यान, बीसीसीआयच्या सिनिअर अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, घटनेचा मसुदा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात येईल. कोलकाता नॅशनल क्रिकेट क्लब (एनसीसी) व क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) यांसारख्या संलग्न संस्थाबाबत बोलताना राय म्हणाले, ‘सर्व काही सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. ते किती क्रिकेट खेळतात याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय करेल.’ लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या तर या दोन्ही संस्थाचे पूर्ण सदस्यत्व आणि मताचा अधिकार गमवावा लागण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)बीसीसीआयतर्फे खेळाडूंसाठी हँडबुकभावना, पैसा याच्यासह सर्वच बाबींचा समावेशबीसीसीआयने खेळाडूंसाठी शुक्रवारी प्रथमच हँडबुक प्रकाशित केले आहे. त्यात भारतीय क्रिकेटपटूंसाठी आर्थिक प्रबंधनासह भावनांवर कसे नियंत्रण राखायचे, याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.या हँडबुकचे शिर्षक ‘व्यावसायिक क्रिकेटपटूंना माहीत असाव्यात अशा १०० गोष्टी’ असे आहे. हे पुस्तक प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रकाशित केले असून लोढा समितीच्या शिफारशींनुसार हे पुस्तक तयार करण्यात आलेले आहे. बीसीसीआयसोबत संलग्न असलेल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी हे अधिकृत हँडबुक आहे.या पुस्तकाची प्रस्तावना भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविडने लिहिलेली आहे. याचे १० भाग असून त्यात अर्थव्यवस्थापनासह दुखापती कशा टाळता येतील आणि त्यातून कसे सावरता येईल, याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.या हँडबुकमध्ये स्वाक्षरी पान, स्वत:च्या शरीराची माहिती, भावनेवर नियंत्रण कसे राखता येईल, कायदा व व्यावसायिक जबाबदारीची माहिती, प्रसारमाध्यमांसोबत बातचित आदी विषयांचा समावेश आहे.भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक द्रविड यांनी हे पुस्तक खेळाडूंसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.प्रस्तावनेमध्ये द्रविडने लिहिले आहे की,‘युवा क्रिकेटपटूंचा प्रशिक्षक म्हणून खेळामध्ये सहभागी होणे व त्यात यशस्वी होण्यासाठी मदत मिळावी, यासाठी अशा प्रकारचे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मला वाटते.’

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयसर्वोच्च न्यायालय