लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आज वाढदिवस असून त्यांना बीसीसीआयने खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक खेळाडू, कर्णधार, समालोचक आणि आता प्रशिक्षक या भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या आहेत.
आपला संघ जेतेपद कसा पटकावेल, याचा विचार कर्णधार आणि प्रशिक्षक करत असतात. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक विधान करत आपल्या संघालाच घरचा अहेर दिला आहे. यंदाच्या विश्वचषकासाठी भारत नाही तर दुसरा एक देश प्रबळ दावेदार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले आहे.
विश्वचषकाला जाण्यापूर्वी प्रशिक्षक संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतो. खेळाडूंच्या तांत्रिक गोष्टींपेक्षा त्यांची मानसीकता कधी सुधारेल, सकारात्मक कशी होईल, असा प्रयत्न प्रशिक्षक करत असतात. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी तारे तोडल्याचे मत चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. भारतीय संघाच्या निवडीच्यावेळीही शास्त्री हजर नव्हते. निवड समिती सदस्य आणि कर्णधार विराट कोहली यांनी एकत्र येऊन विश्वचषकाच्या संघाची निवड केली. पण यावेळी शास्त्री नेमके कुठे होते, हा सवाल चाहत्यांना पडला आहे.
विश्वचषकाबद्दल शास्त्री म्हणाले की, " यंदाच्या विश्वचषकासाठी इंग्लंड हा प्रबळ दावेदार आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये इंग्लंडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याचबरोबर त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजीही बळकट आहे. त्यामुळे विश्वचषक सुरु होण्यापूर्वी इंग्लंड हे विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असतील."
पंधरा सदस्यीय भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका