काश्मीर प्रीमिअर लीगवरून (Kashmir Premier League) नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) या लीगला विरोध केला असून आयसीसीडे या लीगला मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे. बीसीसीआयच्या या पवित्र्याविरोधात पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं निशाणा साधला.
बीसीसीआय या लीगला विरोध करून पाकिस्तानसोबत राजकीय अजेंडा राबवत आहे. मला या लीगमध्ये न खेळण्याची धमकी दिली जात आहे. या लीगमध्ये खेळल्यास भारतात क्रिकेटसंबंधी कोणत्याच गोष्टींसाठी येऊ देणार नाही, अशी धमकी दिली जातेय, असे ट्वीट दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षेल गिब्स यानं केलं होतं.
बीसीसीआयचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सडेतोड उत्तरभारतातील क्रिकेटमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा हक्क हा केवळ बीसीसीआयचा आहे, हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कदाचित माहित नसावा किंवा ते संभ्रमात पडले असावेत. ''मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली ज्याची CBI चौकशी करत आहे. त्यानं केलेलं विधान हे खरं की खोटं याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. समजा गिब्सचं विधान खरं असल्याचे आपण गृहीत धरून चाललो, तरी भारतातील क्रिकेटबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा हक्क हा बीसीसीआयचा आहे,''असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ANI ला सांगितले.