अजित आगरकरचे ५ निर्णय भारतीय संघाचा चेहरा बदलणार; भविष्याचा रोडमॅप ठरणार

भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावाचे शिक्कामोर्तब झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:23 AM2023-07-05T11:23:29+5:302023-07-05T11:23:56+5:30

whatsapp join usJoin us
BCCI’s New chairman of the Selection Committee, Ajit Agarkar has to take care of 5 top decisions | अजित आगरकरचे ५ निर्णय भारतीय संघाचा चेहरा बदलणार; भविष्याचा रोडमॅप ठरणार

अजित आगरकरचे ५ निर्णय भारतीय संघाचा चेहरा बदलणार; भविष्याचा रोडमॅप ठरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावाचे शिक्कामोर्तब झाले. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि आगरकर हा अर्ज दाखल करणारा एकमेव उमेदवार होता. क्रिकेट सल्लागार समितीने ( CAC) त्याची मुलाखत घेतली अन् त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता आगरकरला पाच महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याने भारतीय संघाचा चेहरा बदलणार आहे.  


कसोटी व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये बदल
 अजित आगरकरवर सर्वात मोठी जबाबदारी असेल ती ट्वेंटी-२० व कसोटी संघाची पुनर्बांधणी... आगामी वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन युवा खेळाडूंना संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, वन डे क्रिकेटमध्ये फार बदल पाहायला मिळेल, अशी अपेक्षा नाही. ट्वेंटी-२० संघातून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा पिढीला संधी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो... भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व देण्याचाही विचार होणार आहे. १८ महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे कसोटीचे उप कर्णधारपद दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, त्यातही बदल होऊ शकतो.  


हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे कायमचे कर्णधारपद? वन डे संघाचे काय?
दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद कायमचे सोपवले जाऊ शकते.. वन डे क्रिकेटमध्येही हा बदल दिसू शकतो. अष्टपैलू खेळाडूने मागील काही मालिकांमध्ये ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सांभाळलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये पहिल्याच वर्षी जेतेपद पटकावले अन् २०२३ मध्ये ते पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरले. २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिककडेच नेतृत्व कायम ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. वन डे क्रिकेटमध्ये हार्दिकसह रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांची नावं कर्णधारपदासाठी पुढे आहेत. रोहित शर्माचं वय पाहता यंदाचा वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा होऊ शकतो.  


मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे भवितव्य... 
आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत राहुल द्रविड हा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. आशिया चषक २०२२ मध्ये भारताला सुपर ४ मध्ये गाशा गुंडाळावा लागला होता, मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत हार झाली होती. त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव झाला.  आता आगामी आशिया चषक २०२३ व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर द्रविडचं पुढील भवितव्य अवलंबून आहे. त्याच्यानंतर नवा प्रशिक्षक शोधण्याचं आव्हान अजित आगरकरला पेलावं लागणार आहे.   


ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ आणि WTC ची मोर्चेबांधणी
हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवून BCCI ने सीनियर खेळाडूंना इशाराच दिला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मजबूत संघ निवडण्याचे आव्हान आगरकरसमोर आहे. रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी खेळाडूंशिवाय त्याला हा संघ निवडायचा आहे. त्यासाठी आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून सुरुवात झालेली दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. 


सीनियर्स खेळाडूंनंतर पुन्हा संघबांधणी 
रोहित, विराट यांचे वय पाहता पुढील संघबांधणीचे आव्हान आगरकडे आहेत. विराटकडे अजूनही किमान २ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. पण, रोहित, भुवनेश्वर, मोहम्मद शमी व आर अश्विन यांना हळुहळू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून दूर केले जाईल.   

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: BCCI’s New chairman of the Selection Committee, Ajit Agarkar has to take care of 5 top decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.