मुंबई : भारताच्या माजी खेळाडूंना अजूनही बीसीसीआय धक्का देत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे, पण यामध्ये आता भारताच्या विश्वविजयी संघातील खेळाडू संदीप पाटील यांनाही बीसीसीआयचा मोठा धक्का बसला आहे.
परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी सचिन, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि कपिल देव यांना बीसीसीआयने नोटीस पाठवली होती. आता परस्पर हितसंबंध जपल्यामुळे पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे.
पाटील यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवायची होती. पाटील यांना अध्यक्षपदासाठी उभे राहायचे होते. पण परस्पर हितसंबंध जपल्यामुळे पाटील यांना या पदासाठी उमेदवारी दाखल करता येणार नाही. कारण सध्याच्या घडीला पाटील हे एका वृत्तवाहिनीसाठी क्रिकेटतज्ञ म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे ते जर या पदासाठी उभे राहिले तर हे परस्पर हितसंबंध जपल्यासारखेच आहे. त्यामुळे पाटील यांना मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवता येणार नाही.
येत्या काही दिवसांमध्ये टीम इंडिया मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण बीसीसीआयने शास्त्री यांची ज्यांनी निवड केली त्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. जर या नोटीशीला या सदस्यांना योग्य ते उत्तर देता आले नाही, तर शास्त्री यांची निवड रद्द होऊ शकते.
क्रिकेट सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर त्यांना या नोटीशीला उत्तर पाठवण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. बीसीसीआयकडून नोटीस मिळाल्यावर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे जर क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना योग्य ते उत्तर बीसीसीआयच्या नोटीशीला देता आले नाही तर शास्त्री यांचे प्रशिक्षकपद रद्द होऊ शकते. परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्या शांत रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
Web Title: BCCI's rules shocks to Sandeep Patil after Sachin tendulkar, vvs Laxman, rahul Dravid and Kapil dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.