मुंबई : बीसीसीआयच्या आजच्या दिवशी एका खेळाडूला तीन महिन्यांसाठी निलंबित करताना माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला वॉर्निंग दिल्याचे वृत्त आहे. इरफानला बीसीसीआयने नेमकी कशाबद्दल वॉर्निंग दिली आहे, ते जाणून घ्या...
काय आहे प्रकरण...एका लीगबरोबर इरफान हा जोडला गेला होता. त्या लीगबाबत इरफानने बीसीसीआयला माहिती दिली नसावी. त्यामुळे या लीगमध्ये सहभागी होऊ नये, अशी वॉर्निंग बीसीसीआयने इरफानला दिली आहे.
वॉर्निंग का, निलंबन का नाही...भारतीय 'अ' संघाती रिंकू सिंगचे बीसीसीआयने निलंबन केले. कारण रिंकूने अबुधाबी येथे झालेल्या एका लीगमध्ये सहभाग घेतला होता. याबाबत रिंकूने कोणतीही माहिती बीसीसीआयला दिली नव्हती. पण इरफानचे निलंबन का नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बीसीसीआयने सांगितल्यावर इरफानने या लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय रद्द केला.
इरफान कोणत्या लीगमध्ये सहभागी होणार होताआता क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच लीग पाहायला मिळतात. इरफान हा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) सहभागी होणार होता. पण आता बीसीसीआयने वॉर्निंग दिल्यानंतर त्याला या लीगमध्ये सहभागी होता येणार नाही.
बीसीसीआयकडून खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन, भारतीय संघातून बाहेरमुंबई : आज विश्वचषकाला सुरुवात झाली आणि त्याच दिवशी बीसीसीआयने एका खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी कारवाई केल्यामुळे बीसीसीआय चर्चेत आहे. बीसीसीआयने ही कारवाई केल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे.
नेमके प्रकरण कायभारताचा एक क्रिकेटपटू अबुधाबी येथे झालेल्या एका ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळला होता. या लीगमध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने ही कडक कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआय काय म्हणतेजर एखाद्या खेळाडूला देशाबाहेर जाऊन कोणत्याही स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. जर एखादा खेळाडू परवानगी घेऊन खेळला तर त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करतो. तीन महिन्यांची निलंबनाची कारवाई आम्ही यावेळी करत आहोत.
कोण आहे हा खेळाडूहा खेळाडू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्याचबरोबर भारताच्या 'अ' संघाकडूनही हा युवा खेळाडू खेळला आहे. हा खेळाडू आहे रिंकू सिंग. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 'अ' संघांमध्ये आजपासून सामना खेळवण्यात येणार होता. पण या निलंबनामुळे रिंकूला या सामन्यात खेळता येणार नाही.