यंदाच्या विश्वचषक सामन्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पराभव असेल किंवा अफगाणिस्तानने गत विश्वविजेत्या इंग्लंडचा केलेला पराभव असेल. त्यामुळे, यंदाच्या विश्वचषक सामन्यात अनेकांचे अंदाज चुकल्याचं दिसून आलं. त्यातच, सोमवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानच्या सामन्यातही असाच अफलातून शेवट पाहायला मिळाला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता अफगाणिस्तानने बाबर आजमच्या पाकिस्तान संघाचाही सुपडा साफ केला. अफगाणिस्तानच्या या विजयाचा अनेक भारतीयांनाही आनंद झाला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने या विजयानंतर रशिद खानसोबत चक्क भांगडा खेळून जल्लोष केला. तर, राशिद खाननेही विश्वचषक जिंकल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वचषकातील तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानच आता जवळपास संपल्यात जमा झाले आहे. आता, उर्वरित ४ सामन्यांत इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा पाकिस्तानला सामना करायचा आहे आणि हे चारही सामने जिंकले तर त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. टीम पाकिस्तानची सद्यस्थिती पाहता हे चमत्कारीकच ठरेल. मात्र, सोमवारच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने दाखवलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. म्हणूनच, सोशल मीडियावरही अफगाणिस्तानची वाह वा होत आहे. इराफन पठाणने तर अफगाणिस्तानचा गोलंदाज रशिद खान याच्यासोबत विजयाचा आनंद साजरा केला. अफगाणिस्तान संघानेही विजयाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
अफगाणिस्तानने ८ गडी राखून पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयानंतर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खानने म्हटले की, आज आम्हाला असं वाटतंय, आम्ही वर्ल्डकप जिंकला. यापूर्वी आम्ही पाकिस्तानविरुद्द ७ सामने खेळलो, पण एकही सामना जिंकलो नाही. अनेकदा विजयाच्याजवळ पोहोचलो. मात्र, पदरी पराभवच आला. आज आमच्यात आत्मविश्वास होता, आम्ही जिंकलो, अशी भावना रशिदने व्यक्त केली आहे. पाकिस्तानला पराभूत केल्याचा मोठा आनंद अफगाणिस्तानच्या चाहत्यांना झाला आहे. तर, भारतीयांनीही अफगाणिस्तानला चेअर अप केल्यामुळे, हा आनंद भारतीयंनाही होत आहे.
पाकिस्तानने दिलेल्या २८३ धावांच्या आव्हानाचा १ षटक राखून फडशा पाडल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकच जल्लोश केला. त्यांनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. दरम्यान, या सामन्याचं समालोचन करणाऱ्या इरफान पठाणची रशिद खानशी गाठ पडली. तेव्हा अफगाणिस्तानच्या विजयाबाबत आनंद व्यक्त करत इरफान पठानने रशिद खानची गळाभेट घेतली. तसेच संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच यावेळी इरफान पठानने रशिद खानसोबत जबरदस्त डान्सही केला.
Web Title: "Beat Pakistan, won the World Cup"; The sound of Afghanistan's open cheer, Says rashid khan after won
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.