मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातला सामना भावनिक होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:57 PM2023-05-16T15:57:50+5:302023-05-16T15:59:33+5:30

whatsapp join usJoin us
Before I die, if I get 2 minutes, I would revisit two great moments, Sunil Gavaskar Gets Teary-Eyed On Live TV While Displaying MS Dhoni-Signed Shirt  | मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) IPL 2023 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर चेपॉकवर शेवटचा साखळी सामना खेळत होते. CSKला या सामन्यात KKRकडून ६ विकेट्सने हार मानावी लागली असली तरी चिदंबरम स्टेडियमवरील वातावरण MS Dhoni मय झाले होते. सामना संपल्यानंतरही चाहते धोनीसाठी थांबले होते आणि धोनीने स्टेडियमला प्रदक्षिण मारून स्टँडमधील लोकांकडे टेनिस बॉल फेकले. फ्रँचायझी आणि खेळाडूंनी प्रेक्षकांचे आभार मानणे हा एक प्रशंसनीय कृती होती.


केवळ गर्दीच नाही तर, स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतरच्या कार्यक्रमाचा भाग असलेले दिग्गज भारतीय फलंदाज सुनील गावस्कर हे CSK कुठे चुकले याचे विश्लेषण करत होते, त्यांनाही धोनीचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरता आला नाही. अँकरिंग करत असताना ते धोनीकडे धावत गेले आणि शर्टवर त्याची साईन गेतली. त्यानंतर दोघांनी मिठी मारली आणि गावस्कर यांच्यासाठी ही एक खास आठवण आहे की ते आयुष्यभर लक्षात राहील. त्याबद्दल बोलताना गावस्कर भावूक झाले आणि शर्टावर ऑटोग्राफ मिळाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या दिवशी गावस्करांनी तो शर्ट लाईव्ह टीव्हीवर दाखवला. गावस्कर यांनी धोनीबद्दलच्या प्रेमाचा आणि आदराचा पुनरुच्चार केला. 


"म्हणून, मी माहीकडे गेलो आणि त्याला मी घातलेल्या शर्टवर ऑटोग्राफवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्याला हे मान्य केल्याने खूप आनंद झाला. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता कारण या व्यक्तीने भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे," असे सुनील गावस्कर म्हणाले आणि यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या 
  

कसं काय भावा? अरे, मला कुत्रा चावला; मैदानात उतरताच अर्जुन तेंडुलकरनं दाखवली जखम

गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला

जोफ्रा आर्चर IPL नंतर ॲशेस मालिकेतूनही झाला बाहेर; इंग्लंडला मोठा झटका



"मला माहित आहे, माझ्या आयुष्यातील शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत, त्यामुळे मला मरण्यापूर्वी, जर मला २ मिनिटे मिळाली, तर मी दोन महान क्षणांना पुन्हा भेट देईन. कपिल देवने १९८३ विश्वचषक ट्रॉफी उचलताना आणि एमएस धोनीने २०११ च्या विश्वचषकात विजयी षटकार ठोकल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बॅट मनगटाने फिरवली, हे दोन क्षण पाहिले तर मी शांतपणे मरेन,” असे गावस्कर म्हणाले.   


CSK १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि शनिनिवारी त्यांचा शेवटचा साखळी सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.  

Web Title: Before I die, if I get 2 minutes, I would revisit two great moments, Sunil Gavaskar Gets Teary-Eyed On Live TV While Displaying MS Dhoni-Signed Shirt 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.