Join us  

वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी BCCI समोर ठेवली मोठी अट

  Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ च्या यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात वाद रंगला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 12:36 PM

Open in App

India vs Pakistan ODI World Cup 2023 । नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ च्या (Asia Cup 2023) यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद रंगला होता. अलीकेडच पाकिस्ताननेबीसीसीआयची भूमिका मान्य करून या वादाला पूर्णविराम दिला होता. कारण भारताने ठेवलेल्या अटीनुसार आशिया चषकातील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होणार असून पाकिस्तानात होणार नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी (Nazam Sethi) यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली होती. खरं तर आशिया चषक २०२३ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते. 

दरम्यान, जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आशियाई क्रिकेट परिषदेने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्तावित 'हायब्रीड मॉडेल'ला मान्यता दिलेली नाही, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. 'हायब्रीड मॉडेल'नुसार, भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल तर अन्य सामने पाकिस्तानात होतील. माहितीनुसार, नजम सेठी ८ मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते ACC आणि ICC अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. दुबईच्या भेटीदरम्यान सेठी हे पाकिस्तानला पाठिंबा मिळवण्यासाठी मागणी करण्याची अपेक्षा आहे. लक्षणीय बाब म्हणजे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत बीसीसीआय आणि आयसीसीने लेखी हमी द्यावी. तसेच ही हमी भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी द्यावी, असे सेठी यांचे मत आहे.

या मैदानांवर होऊ शकतात सामनेपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी वन डे विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यासाठी तयार आहेत. पण त्यासाठी त्यांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून लेखी हमी हवी आहे की, २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत त्यांच्या देशात अर्थात पाकिस्तानमध्ये सहभागी होईल. वन डे विश्वचषक यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठी, BCCI ने भारत आणि पाकिस्तान या सामन्याठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम निवडल्याचे समजते. तर चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता ही पाकिस्तानच्या सामन्यांसाठी मैदाने म्हणून निवडली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, जिथे एक लाख प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाकिस्तानबीसीसीआयभारत विरुद्ध पाकिस्तानजय शाहएशिया कप 2022
Open in App