भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज १४ ऑक्टोबर रोजी विश्वचषक सामना रंगणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादला पोहोचले आहेत. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, दोन्ही संघांचे चाहतेही सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे समर्थकही दाखल होत आहेत. पाकिस्तानी संघाचे सर्वात मोठे समर्थक मानले जाणारे 'पाकिस्तानी चाचा' या नावाने प्रसिद्ध असलेले बशीर चाचा देखील सामना पाहण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी, रस्त्याच्या कडेला घोषणाबाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये भारतीय चाहत्यांच्या प्रतिसादानंतर ते डोकं धरून बसले असल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेट फॅन बशीर चाचा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये 'पाकिस्तानी चाचा' 'जीतेगा भाई जीतेगा...' असा नारा देत आहेत, भारतीय चाहत्यांकडून या घोषणेला मिळालेला प्रतिसाद ऐकून 'चाचा'यांनी डोकं धरले. भारतीय चाहते च्या घोषणेला प्रत्युत्तर देताना म्हणतात, "भारत जिंकेल" ही त्यांची घोषणा. यानंतर आलेल्या 'चाचा' यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे सर्वात मोठे चाहते मानले जाणारे बशीर चाचा पाकिस्तान संघाचे सामने पाहण्यासाठी जगभर फिरतात. यावेळी ते आपल्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 'चाचा' एक जर्सी घालतात त्याच्या अर्ध्या भागावर भारताचा तिरंगा ध्वज आणि दुसऱ्या अर्ध्यावर पाकिस्तानचा ध्वज असतो. पाकिस्तानी चाहत्याचा पेहराव पाहून भारतातील लोकही त्यांना प्रेम देताना दिसत आहेत.
आज म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी क्रिकेट विश्वचषक-२०२३ चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये होणार आहे. उभय संघांमधील ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सातही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारत विश्वचषकात आणखी एक विजय मिळवून अपराजित राहतो की पाकिस्तान पहिला विजय मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
NZ vs BAN Live : गड आला पण... ! न्यूझीलंडची विजयी हॅटट्रिक अन् केन विलियम्सनला पुन्हा 'दुखापत'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दोन नावांची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांमध्ये भारताकडून विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या नावाचा समावेश आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात.